अक्षय बडवे | पुणे
भाजपने राज्यसभेसाठीच्या आपल्या उमेदरांची यादी काल जाहीर केली आहे. भाजपने नुकतेच भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , डॉ. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्या नावाची घोषणा झाल्याने पुण्यातील भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
मात्र मेधा कुलकर्णी यांना मिळालेल्या उमेदवारीचा नेमका राजकीय अर्थ काय हे देखील समजून घेतलं पाहिजे. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी (Rajyasabha Election 2024) म्हणजे भाजपकडून डॅमेज कंट्रोल आहे का? भाजपने पुण्यातील ब्राह्मण समाजाची केली नाराजी दूर? असं देखील बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने शहरात ब्राह्मण नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यात कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवार नाकारण्यात आल्याने त्याची किंमत पक्षाला मोजावी लागली होती. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल ब्राह्मणांमध्ये नाराजी असताना निष्ठावंत असलेल्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून भाजपने डॅमेज कंट्रोल केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करत ब्राह्मणांनी नाराजी दूर केल्याचं बोललं जात आहे. याशिवाय भाजपने आगामी लोकसभा निवडणूक सोपी केली, असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत पुण्याच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा सामावेश आहे. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भाजपच्या महिला आघाडीमधील नेत्यांपैकी प्रमुख नाव मेधा कुलकर्णी यांचं आहे. भाजपमधून २ टर्म नगरसेविका म्हणून देखील निवडून आल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.