BMC Election 2023: मुंबईचा 'रणसंग्राम' सुरू; आगामी BMC निवडणुकीसाठी भाजपचा अ‍ॅक्शन प्लान तयार

Latest News: जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या (BJP) नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
BMC Election news
BMC Election news saam tv
Published On

जयश्री मोरे, मुंबई

Mumbai News: मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National President J. P. Nadda) यांनी भाजपच्या (BJP) नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या (BMC Election 2023) पार्श्वभूमीवर जे. पी नड्डा यांनी अनेक बैठका घेत सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

BMC Election news
Mumbai Fire News: भायखळ्यातील घोडपदेव परिसरात भीषण आग; चार घरे भस्मसात

जे पी नड्डा यांनी सुस्त पडलेल्या माजी नगरसेवकानाही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा प्रभागांमध्ये सक्रिय होण्यास त्यांनी सांगितले आहे. महानगरपालिकेतील घोटाळ्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून ठाकरे गटाची पोलखोल करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. मुंबई महानगर पालिका जिंकायची असेल तर आतापासूनच कामाला लागा असे त्यांनी सांगितले आहे.

तसंच, मुस्लिम आणि दलित मतदारांना कशा पद्धतीने वळवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. 18 ते 21 वयोगटातील तरुणांचे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान यादीत नाव नोंद करून घ्या. शिंदे- फडणवीस सरकारने मुंबईसाठी घेतलेले निर्णय आणि कामे मुंबईकरांपर्यत पोहोचवा, असे देखील त्यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना सांगितले आहे.

BMC Election news
Devendra Fadnavis On Bailgada Sharyat: 'हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय', बैलगाडा शर्यतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

दरम्यान, जे. पी नड्डा यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी टीका केली आहे. 'जर जे. पी. नड्डा यांना मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल याची खात्री असेल, तर त्यांनी बीएमसीची निवडणूक ताबडतोब घेण्याची मागणी करावी. अन्यथा त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याची भीती वाटते हे सिद्ध होईल आणि जे ते मुंबईत बोलले ते फक्त विजयाची खोटी कथा तयार करण्यासाठी बोलले आहेत.', असे क्लाईट क्रोस्टो यांनी सांगितले.

नड्डा यांना हे माहीत असणे आवश्यक आहे की, महापौर होण्यासाठी त्यांनी प्रथम बीएमसीची निवडणूक लढवली पाहिजे. जी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार टाळत आहे. कारण भाजप महाराष्ट्राच्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, आता निवडणूक झाल्यास त्यांचा पराभव होईल. एकनाथ शिंदे गटाने त्यांना मतदाते मिळवून दिलेले नाहीत, खरे तर सत्तापालट केल्यानंतर शिंदे गटाशी जुळवून घेऊन त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे, हे भाजपला माहीत आहे.', असे देखील क्लाईट क्रोस्टो यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com