मुंबईत भाजपप्रणीत महायुतीला बहुमत मिळालं... आणि बिहारचे जेडीयूचे मंत्री अशोक चौधरींनी वळवळ करायला सुरुवात केली... मुंबईत बिहार भवन बांधण्यावरुन बिहारच्या मंत्र्याने मुंबईकरांचा बाप काढलाय.. होय... मुंबईकरांचा बाप काढलाय... एवढंच नाही तर बिहार भवनचं काम थांबवून दाखवा, अशी धमकीच अशोक चौधरींनी राज ठाकरेंना दिलीय... त्याचा मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी चांगलाच समाचार घेतलाय...
दुसरीकडे अशोक चौधरींच्या विधानाविरोधात ठाकरेसेनाही आक्रमक झालीय.. अशोक चौधरी महाराष्ट्रात आले तर त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलला पाठवू, असा इशारा ठाकरेसेनेनं दिलाय.. खरंतर मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेली.. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी दक्षिण मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिस्टन इस्टेटमधील जागेवर 30 मजली टोलेजंग बिहार भवन बांधण्याला मंजूरी देण्यात आली...मात्र मुंबईकरांच्या नाकावर टिच्चून बांधण्यात येणाऱ्या बिहार भवनमध्ये नेमकं काय असणार आहे..
एल्फिन्स्टन इस्टेट येथे बिहार भवन उभारणार
बिहार सरकारची 314 कोटी 20 लाखांच्या निधीला मंजुरी
30 मजली इमारतीत बिहार भवन असणार
भवन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार
मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय
खरंतर 2022 मध्येच मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन बांधण्याची घोषणा करण्यात आली.. मात्र या घोषणेला 4 वर्षे लोटून गेल्यानंतरही मराठी भाषा भवनचं काम रखडलंय.. मात्र दुसरीकडे बिहार भवनला तातडीने मंजूरी देण्यात आलीय.. त्याचा राग मराठी भाषकांमध्ये असतानाच आता बिहारी मंत्र्याने मुंबईकरांबाबत मुजोरीची भाषा केलीय.. त्यामुळे यावरून वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्ह आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.