रुपाली बडवे, साम टीव्ही
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकासआघाडीला मोठा धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या गटात सामील करून घेतलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. (Latest Marathi News)
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटासह महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi)धक्क्यावर धक्के देणे सुरू आहे. आज पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यात करमाळा विधानसभेचे माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला.
याशिवाय वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार, विजय मदने, आंनद यादव, अरविंद बगाडे, अंकुश घनवट, डॉ. विशाल खळदकर, अशोक फडतरे, सोमनाथ माकर, दीपक भांडलकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांचा यात समावेश होता. (Maharashtra Political News)
या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री विजयबापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.