Pune News : गजा मारणे टोळीतील फरार गुंड रुपेश मारणेला अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Rupesh Marne Arrested
Rupesh Marne Arrested Saam Tv

सचिन जाधव

पुणे - व्यावसायिकाचे अपहरण करून २० कोटीची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला गजा मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे (Rupesh Marne) याला अटक करण्यात आली. गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील तो कुख्यात गुंड आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने मुळशी परिसरातून गजा मारणे आणि त्याच्या साथीदाराला रात्री उशिरा अटक केली आहे. रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्या दोघा गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Pune Latest News)

Rupesh Marne Arrested
Mumbai : शिवसेनेच्या 'त्या' शाखेवर शासनाची कारवाई; शिवसैनिकांकडून नाराजी

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केली होती. कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह १५ जणांवर मोक्का कारवाई केली. गज्या मारणे याला अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते. अखेर या फरार गुंड रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात व्यावसायिकाने २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते. याप्रकरणी तपास सुरू असताना सराईत रूपेश आणि त्याचा साथीदार मुळशीत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक पाटील, अंमलदार सुधीर इंगळे, राहुल सकट, अमोल वाडकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने दोघांना अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com