Traffic police
Traffic policeMahaparinirvan Diwas 2023: Mumbai Traffic Update Din- Saam Tv

Mumbai News: ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, ७३९ परवाने केले निलंबित

Mumbai Traffic police: मुंबईत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऑटोरीक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांना आतापर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
Published on

Mumbai Traffic police:

मुंबईत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऑटोरीक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांना आतापर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये दोषी आढळलेल्या 739 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप व ईमेल आयडीवर 11 जुलै 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कार्यालयाशी निगडीत 790 तक्रारी आहेत. त्यापैकी 672 तक्रारी या ऑटोरिक्षा व 118 तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधीत आहेत. तक्रारींमध्ये 588 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, 59 तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे व 143 तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 790 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. दोषी आढळलेल्या एकूण 739 परवानाधारकांचे परवाना निलंबित करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Traffic police
Lok Sabha Election 2024: भाजपा लोकसभेच्या 32 जागांवर ठाम? शिंदे -पवारांनी केली इतक्या जागेची मागणी; शाह सोडवणार जागावाटपाचा तिढा?

यापैकी 557 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 66 वाहनधारकांकडून 1 लाख 63 हजार 500 रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. तसेच 128 परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, 54 परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाने 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण 96 प्रकरणात 2 लाख 37 हजार रूपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.  (Latest Marathi News)

तसेच 37 तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच सद्यस्थितीत परवाना निलंबित करण्यात आलेल्या 643 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ‘नॉट टू बी ट्रान्सक्टेड’ नोंद (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. कारवाईच्या माहितीबाबत तक्रारदारांना व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर या माध्यमांतून अवगत करण्यात आले आहे.

Traffic police
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप; ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करणार?

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाशांनी आश्वस्त रहावे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. खोटी तक्रार दाखल करणे हा भारतीय दंड विधान कलम 192, 193, 199 व 200 अंतर्गत दंडनीय अपराध आहे. या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत.

नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी चालकांकडून गैरवर्तन भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतील, तर 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि mh०३autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर योग्य त्या पुराव्यासह तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com