Bhimashankar Mandir: भिमाशंकरला जाण्याचा प्लान करताय? तर थोडं थांबा, आजपासून मंदिर ३ महिन्यांसाठी बंद; कारण काय?

Bhimashankar Mandir Closed For 3 Months: १२ ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर असलेले मंदिर आजपासून बंद राहणार आहे. विकास कामांसाठी पुढील ३ महिने हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
Bhimashankar Mandir
Bhimashankar MandirSaam Tv
Published On
Summary

भीमाशंकरचे मंदिर ३ महिन्यांसाठी बंद

विकास कामांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकासकामे सुरु

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराला भेट देण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आजपासून भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे. मार्च महिन्यापर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आता भीमाशंकरला गेलात तर तुम्हाला दर्शन घेता येणार नाही. याबाबत मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे.

Bhimashankar Mandir
IRCTCचं खास पॅकेज! ७ ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार एकाच ट्रीपमध्ये! भाडं फक्त इतकंच, वाचा सविस्तर

त्र्यंबकेश्वर मंदिर ३ महिन्यांसाठी बंद (Trimbkeshwar Mandir Closed for 3 Months)

पुढील वर्षी त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या कुंभमेळा होणार आहे. यामुळे या ठिकाणी अनेक भाविक येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भिमाशंकर येथे विकास आराखड्यातूनन विविध विकास कामे पार पडत आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचा परिणाम विकास कामांवर होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भिमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असून भिमाशंकरकडे जाणारे मार्ग पर्यटक आणि भाविकांसाठी बंद राहणार आहे. दरम्यान भिमाशंकर मंदिर दर्शानासाठी बंद ठेवण्यात येणार असलं तरी मुख्य शिवलिंगाची विधिवत पुजा कायम सुरु रहाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला दर्शन न घेताच परत यावे लागेल.

Bhimashankar Mandir
Nashik Trimbkeshwar Darshan: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीचा मोठा निर्णय; ऑनलाईन पास देऊन दर्शन वेळेतच...

२०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा

२०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार असून येथे लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मंदिर परिसरात अनेक विकास कामे केली जात आहे. या कामात भाविकांच्या गर्दीमुळे व्यत्यय येऊ नये आणि भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bhimashankar Mandir
Bhimashankar Temple News | Pune | पहाटे शिवलिंगावर दुग्धाभिषेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com