Bhandara: जीवनदायिनी वैनगंगा ठरतेय मरणदायिनी, नदीत उडी घेत 17 लोकांनी आत्महत्या

काही वर्षापासून याच जीवनदायिनी वैनगंगा नदीत नैराश्यातून अनेक लोकांनी आत्महत्या केल्याने या जीवनदायिनी नदीला मरणदायिनी संबोधल्या जाऊ लागले आहे
Bhandara Wainganga River
Bhandara Wainganga RiverSaam Tv
Published On

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि उद्योजकांचे भरण-पोषण करत असल्यामुळे तिला जीवनदायिनी म्हणून गणल्या जाते. मात्र, काही वर्षापासून याच जीवनदायिनी वैनगंगा नदीत नैराश्यातून अनेक लोकांनी आत्महत्या केल्याने या जीवनदायिनी नदीला मरणदायिनी संबोधल्या जाऊ लागले आहे (Bhandara 17 people commit suicide in Wainganga river in past one and half year).

Bhandara Wainganga River
दुर्देवी: तिच्या वाढदिवशीच तिच्यावर अंत्यसंस्कार; नाशिकच्या पूर्वाची आत्महत्या की खून? 

भंडारा (Bhandara) जिल्ह्याला वैनगंगा नदीचा विस्तीर्ण असा किनारा लाभला असून या वैनगंगेच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेती सुजलाम-सुफलाम झालेले आहेत. तर अनेक जिल्ह्यातील उद्योजकांना भरभराटी आली आहे. मात्र, मागील दीड वर्षांपासून याच वैनगंगा नदीला (Wainganga river) आत्महत्या (Suicide) स्पॉट बनवत गालबोट लावलेले आहे.

जिल्ह्यात तब्बल दीड वर्षात 17 जणांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेत आपले जीवन संपवले आहे. लोकांची मानसिकता लक्षात घेता ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे वैनगंगा महोत्सव साजरा करत वैनगंगा नदीच्या सुजलाम-सुफलामतेचे गुण गायले जात आहे. तर दुसरीकडे, त्याच ठिकाणी वाहत असलेले मृतदेह पाहून वैनगंगा नदीला सुद्धा रडू येत आहे.

त्यामुळे पोलीस प्रशासनाने या संबंधित सुसाईड स्पॉट शोधून त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी जनमानसातून केली जात आहे. जेणेकरुन नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची मदत होऊ शकेल.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com