
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा बेस्टचा प्रवास महागणार आहे. बेस्टचा प्रवास दुप्पट होणार आहे. भाडेवाढीला मुंबई महानगर पालिकेने मंजुरी दिली आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे सादर करण्यात आला आहे. बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होणार असल्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे.
आर्थिक तोट्यात असेलल्या बेस्टने सरासरी तिकिटाच्या दरात आणि पासमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बेस्टचा प्रवास महागणार आहे. या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. एसी बसचे भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये होणार आहे. पण बेस्टच्या भाडेवाढीवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बेस्ट बसच्या दरवाढीबाबतच्या प्रस्तावाला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा आग्रह केला होता. भाडेवाढीबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे देखील पाठवण्यात आला होता. आता पालिका प्रशासनाने भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. सध्या बेस्टला वर्षाला ८४५ कोटींचा महसूल मिळतो. बेस्टच्या तिकीटात भाडेवाढ झाली तर बेस्टचे वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
५ किलोमीटर प्रवासासाठी ५ रुपयांवरुन १० रुपये द्यावे लागणार.
१० किलोमीटर प्रवासासाठी १० रुपयांवरुन १५ रुपये द्यावे लागणार.
१५ किलोमीटर प्रवासासाठी १५ रुपयांवरुन २० रुपये द्यावे लागणार.
२० किलोमीटर प्रवासासाठी २० रुपयांवरुन ३० रुपये द्यावे लागणार.
५ किलोमीटर प्रवासासाठी ६ रुपयांवरुन १२ रुपये द्यावे लागणार.
१० किलोमीटर प्रवासासाठी १३ रुपयांवरुन २० रुपये द्यावे लागणार.
१५ किलोमीटर प्रवासासाठी १९ रुपयांवरुन ३० रुपये द्यावे लागणार.
२० किलोमीटर प्रवासासाठी २५ रुपयांवरुन ३५ रुपये द्यावे लागणार.
५ किलोमीटर प्रवासासाठी ४५० रुपयांवरुन ८०० रुपये द्यावे लागणार.
१० किलोमीटर प्रवासासाठी १००० रुपयांवरुन १२५० रुपये द्यावे लागणार.
१५ किलोमीटर प्रवासासाठी १६५० रुपयांवरुन १७०० रुपये द्यावे लागणार.
२० किलोमीटर प्रवासासाठी २२०० रुपयांवरुन २६०० रुपये द्यावे लागणार.
५ किलोमीटर प्रवासासाठी ६०० रुपयांवरुन ११०० रुपये द्यावे लागणार.
१० किलोमीटर प्रवासासाठी १४०० रुपयांवरुन १७०० रुपये द्यावे लागणार.
१५ किलोमीटर प्रवासासाठी २१०० रुपयांवरुन २३०० रुपये द्यावे लागणार.
२० किलोमीटर प्रवासासाठी २७०० रुपयांवरुन ३५०० रुपये द्यावे लागणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.