शिवनेरी किल्ल्यावर गेलेल्या २०० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

मधमाश्यांनी चावा घेतल्याची माहिती राज्याच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली
 Shivneri fort
Shivneri fortSaam Tv
Published On

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याला (shivneri fort) भेट देण्याकरिता गेलेल्या कमीत- कमी २०० पर्यटकांना (tourists ) रविवारी दुपारी मधमाश्यांनी (bees) चावा घेतल्याची माहिती राज्याच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यापैकी २५ जणांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात (hospital) प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. (bees attack 200 tourists at shivneri fort)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असताना दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. पुणे (Pune) शहरापासून सुमारे ९५ किमी अंतरावर हा किल्ला असून परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. पुणे वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, प्राथमिक तपासणीमध्ये असे दिसून आले आहे की, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या किमान ३ मधमाशांच्या पोळ्यांमधून मधमाशांचे थवे बाहेर आले होते.

 Shivneri fort
बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळे; प्रितम मुंडेंची धनंजय मुंडेंना जहरी टीका

जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्यावर काहीतरी फेकते तेव्हा किंवा मोठ्या प्रमाणावर लोक पोळ्यांभोवती जमा झाले की त्या वासाने या माश्या बाहेर येत असतात. यामुळे २०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला आहे. सुमारे २५ जणांना अनेक डंखांचा त्रास झाला आहे. काही क्षणातमध्येच मधमाश्यांच्या झुंडीने मोठा परिसर व्यापला असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. स्थानिक पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेक डंख मारलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केले, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com