बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळे; प्रितम मुंडेंची धनंजय मुंडेंना जहरी टीका

बीड (Beed) जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला
Pritam Munde Criticize Dhananjay Munde
Pritam Munde Criticize Dhananjay Mundeविनोद जिरे
Published On

बीड: बीड (Beed) जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच बीड हा बिहार राज्य (Bihar) झाला आहे, अशी टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. यावरच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हात जोडून विनंती करतो पण जिल्ह्याची (district) बदनामी करू नका, अशी विनंती जाहीर व्यासपीठावरून करण्यात आली होती. आता यालाच प्रत्यूत्तर बीड (Beed) जिह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी दिले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे, ती तुमच्या नाकर्तेपणामुळेच झाली आहे. असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. (Pritam Munde Beed notoriety because your denial Dhananjay munde)

हे देखील पहा-

प्रीतम मुंडे म्हणाले यावेळी म्हणाले की, बीड (Beed) जिल्ह्याची सुरक्षा आणि भविष्या विषयी चिंता हा पंकजा मुंडे यांचा धर्म आहे. याकरिता त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पण आज बीडची जी बदनामी होत आहे. ती केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे होत आहे. बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा- सुव्यवस्थेचे वास्तव पंकजाताई मुंडे यांनी मांडले होते. यामध्ये चुकीचे काय होते? हा प्रश्न केवळ पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला नाही, तर सर्व जनता आणि माध्यमांनी देखील भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये या विषयावर आक्रमक लक्षवेधी मांडली.

तरीदेखील तुमचे डोळे उघडत नाही. जनतेला तुम्ही गृहीत धरत आहात का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित धनंजय मुंडे यांना केला आहे. प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या की, पंकजा या ७ तारखेला रुग्णालयात अ‍ॅडमिट होते. त्याच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती खराब आहे. पंकजा यांना पातळी सोडून राजकारण करता येत असते, तर त्या खूप काही बोलले असते. पण त्या तत्त्वाच्या राजकारणी आहेत. तुमचे आमदार लक्षवेधी अगोदर देतात. गावामधील कार्यालयापासून ते तुमच्या कॅबिनपर्यंत माफिया राज आहे. हे जगजाहीर आहे.

Pritam Munde Criticize Dhananjay Munde
Share Market: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये किंचीत तेजी

जिल्ह्यात गुन्हेगारीच्या ज्या काही घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ते तुमच्या कारभाराचे अपयश आहे. त्यावर चिंतन करायचे सोडून उलट पंकजा यांच्यावर टिका करणे हे शोभतं का? स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्‍यावर फोडण्याची तुमची नेहमीचीच सवय आहे, असे देखील प्रितम मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बीड बिहार झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानावर बीडचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते की, २ राजकीय पक्षांमध्ये २ विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या. तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचेय आहे, तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करू नका. हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमीला बदनाम करु नका. बीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे बीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे असे म्हणाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com