Share Market: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये किंचीत तेजी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटची सुरुवात सावधपणे झाली आहे.
Share Market: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये किंचीत तेजी
Share Market: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये किंचीत तेजीSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटची सुरुवात सावधपणे झाली आहे. जागतिक मार्केटमधून फार चांगले संकेत मिळत नाही. आशियाई शेअर बाजार घसरले आहेत. त्याचा परिणाम देशांअतर्गत शेअर मार्केटवर (Share Market) होण्याची शक्यता आहे. आज शेअर मार्केटसुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये (Sensex) ६४ अंकांची तेजी दिसून आली. तर निफ्टी फक्त ३ अंकांनी वधारला होता. निफ्टी १६६६३ अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स ५५६१४ अंकावर सुरू झाला होता.

सेन्सेक्स आज सुरू होताच ५५,८०० अंकांचा टप्पा ओलांडला आहे. बाजार सुरू झाल्यावर सेन्सेक्स वधारला होता. सेन्सेक्स २६१.४४ अंकांनी वधारला ५५,८११ चा स्तर गाठला होता. निफ्टीमध्ये ५० पैकी २८ शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून आले आहे. तर, २२ शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टी देखील ३४५४६ अंकांवर सध्या व्यवहार करत आहे.

हे देखील पहा-

पेटीएममध्ये घसरण

पेटीएमच्या (Paytm) शेअरमध्ये घसरण सुरू आहे. पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. पेटीएमच्या शेअरने ७०० रुपयांचा स्तर गाठला आहे. आरबीआयने पेटीएमच्या पेमेंट बँकेवर गेल्या आठवड्यात निर्बंध लागू केले होते.

Share Market: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये किंचीत तेजी
Corona: चिंता वाढली! चीनमध्ये पुन्हा कोरोना विस्फोट; अनेक शहरात लॉकडाऊन

शुक्रवारी शेअर बाजार वधारला

शुक्रवारी, बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) ८५.९१ अंकांनी वधारला तर निफ्टीही (Nifty) ३५.६० अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये ०.१५ टक्क्यांची वाढ होऊन तो ५५,५५०.३० वर येऊन पोहोचला आहे. तर निफ्टीमध्ये ०.२१ टक्क्यांची वाढ होऊन तो १६,६३०.५० वर येऊन पोहोचला होता. शुक्रवारी २००४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ करण्यात आली होती. तर १२५७ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ११२ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com