Thane Barvi Dam: ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट टळलं; बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं

सध्या धरणातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणाचे ११ दरवाजे उघडले गेले आहेत.
Thane Barvi Dam
Thane Barvi DamSaam TV
Published On

बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून बारवी धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे आज बारवी धरण (Barvi Dam) शंभर टक्के भरलं असून, सध्या धरणातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणाचे ११ दरवाजे उघडले गेले आहेत. सध्या धरणात ३४० एमसिमएम एवढा जलसाठा झाला असून पाण्याने ७२.६० मीटर ही उच्च पातळी ओलांडली आहे.

ठाणे जिल्ह्याची (Thane District) तहान भागावणारं बारवी धरण मागील वर्षी ९ सप्टेंबर रोजी ओव्हरफ्लो झालं होतं. मात्र, यंदा हे धरण एक महिना अगोदरच पुर्ण क्षमतेन भरलं आहे. मध्यंतरी पावसानं दांडी मारल्यानं यंदा ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती.

पाहा व्हिडीओ -

मात्र, आता गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा आज पूर्ण झाला असून धरण भरल्याने ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी आणि उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर या भागाचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने ही ठाणे जिल्ह्यासाठी गुड न्यूज असल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com