Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; अवैधरित्या राहणाऱ्या तीन बांग्लादेशी नागरिकांना केली अटक

मुंबई पोलिसांचे दहशतवादी विरोधी पथक आणि डी एन नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईने या तिघांना अटक करण्यात आली आहे.
mumbai crime news
mumbai crime newssaam tv

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली अक्सा मशीद परिसरात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे दहशतवादी विरोधी पथक आणि डी एन नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईने या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तीनही बांगलादेशी नागरिक भारतात अवैध मार्गाने घुसून मागील सहा महिन्यांपासून वास्तव्य करत होते.

mumbai crime news
Mumbai Crime: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा अफवेचा फोन; हाजीअली येथे अतिरेकी येणार असल्याची अफवा

डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली परिसरात तीन बांगलादेशी (Bangladesh) नागरिक अवैधपणे मागील सहा महिन्यापासून वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्यांकडून डी एन नगर पोलीस ठाण्याला मिळाली होती. यानंतर मिळालेल्या माहितीची खात्री जमा करून डी एन नगर पोलीस ठाणे आणि दहशतवादी पथकाने या बांगलादेशींना पकडण्यासाठी पथक तयार केले. डी एन नगर पोलीस आणि दहशतवादी पथकाची टीम या बांगलादेशींना ताब्यात घेण्यासाठी खबऱ्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली असता घर बंद असल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.

मात्र, एक नोव्हेंबर या दिवशी तिघेही बांगलादेशी नागरिक अक्सा मशिदीजवळील सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ येणार असल्याचे पक्की खबर मिळाली.यानंतर पंच आणि कारवाईसाठी नेमलेली टीम अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली वायरलेस रोड जवळील सार्वजनिक सुलभ शौचालय जवळ पोहचून तीनही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले यानंतर त्यांच्या बंद घराची झाडाझडती करून तपासणी केली.

मात्र, हे तीनही आरोपी पोट भरण्यासाठी मुंबईत (Mumbai) मागील सहा महिन्यापूर्वी दलालाच्या मदतीने कोलकत्ता आणि आगरताळा मार्गे जिथे संरक्षक कुंपण नाही अशा जंगली भागातून भारतात घुसले असल्याचे तीनही बांगलादेशी नागरिकांनी कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

mumbai crime news
Andheri News : युवकाने आजीचा केला खून, आईचाही दाबला गळा अन् नंतर...

अटक करण्यात आलेले मोहम्मद जाफर बदल आलम शेख, 44 वर्ष, रेहान मोहम्मद नबी शेख, 23 वर्ष आणि मोहम्मद सोयल साबुद्दीन खान, 30 वर्ष हे तीनही आरोपी डी एन नगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे. हे तीघेही बांगलादेश मधील नवखाली कबीरहाट भागात राहणारे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com