Andheri News : युवकाने आजीचा केला खून, आईचाही दाबला गळा अन् नंतर...

पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.
Mumbai Crime News, Andheri
Mumbai Crime News, AndheriSaamTv

Mumbai Crime News : मुंबई येथील अंधेरीमधील डी.एन.नगर परिसरात एका युवकाने आजी व आईचा गळा दाबून खून केला. या कृत्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास समोर आली आहे. (Andheri Latest Marathi News)

अंधेरी (andheri) येथील डी. एन. नगर परिसरातील इंदिरानगर भगत सिंग नगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी (police) घटनेचा कसून तपास सुरु केला आहे. (Maharashtra News)

Mumbai Crime News, Andheri
अजित पवारच मुख्यमंत्री असतील, काळ्या दगडावरची भगवी रेष; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा (पाहा व्हिडिओ)

या घटनेत समीर रवी बारस्कर (वय ३४) , मिनाताई बारस्कर (वय ५५) , फातिमा इब्राहिम शेख (वय ६५) हे मृत्यमुखी पडल्याची माहिती पाेलिसांनी दिली. कर्जबाजारी झाल्याने निराश झालेल्या युवकाने (youth) हे चुकीचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Mumbai Crime News, Andheri
Mauda Accident News : माैदा तालुक्यात भीषण अपघात; रिक्षातील चिमुकलीचा मृत्यू

या प्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात समीर बारस्कर याच्या विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Mumbai Crime News, Andheri
Kartiki Ekadashi Yatra Pandharpur : विठुरायाला अकरा लाखांचा सोन्याचा चंदनहार अर्पण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com