Bandra-Worli Sea-Link: खळबळजनक! वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाची समुद्रात उडी; नौदलाकडून 'सर्च ऑपरेशन'

Bandra-Worli Sea-Link News: मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाने व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam tv

Bandra Worli Sea Link News:

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाने व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने सी-लिंकवर येऊन कार पार्क केली. त्यानंतर समुद्रात उडी मारली आहे. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा नौदलाकडून शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एकाने कार पार्क करत समुद्रात उडी मारली आहे. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा नौदलाकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती कार घेऊन वांद्रे-सी लिंकवरून जात होता. त्यानंतर या व्यक्तीने सी-लिंकवर कार थांबवली. त्यानंतर त्याने समुद्रात उडी मारली. या घटनेनंतर नौदलाकडून समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. या व्यक्तीला शोधण्यासाठी एका हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

Mumbai News
Jaipur-Mumbai Train Firing: मृतदेह खाली पडले होते, तो बंदूक घेऊन फिरत होता; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

सी-लिंकवरून उडी मारत अनेकांनी जीवन संपवलंय

दरम्यान, मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून अनेकांकडून उडी मारण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या सी-लिंकवरून उडी मारण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. या प्रकरणांमुळे मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले होते.

Mumbai News
Mumbai Crime News: धक्कादायक! पत्नीला खारमध्ये फिरायला नेलं, वाद होताच पतीनं केलं भयानक कृत्य

४५ वर्षीय व्यक्तीनेही मारली होती समुद्रात उडी

दरम्यान, याआधी एका ४५ वर्षीय व्यक्तीने वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारली होती. मुलाच्या अकाली निधन झाल्याने हा व्यक्ती नैराश्यात होता. या व्यक्तीने टॅक्सी चालकाला लीलावती रुग्णालयात जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा हाजी अली येथे जायचे असे सांगून वांद्रे-वरळी सी-लिंकवर आला.

लघवी करण्याच्या बहाण्याने हा व्यक्ती टॅक्सीतून उतरला. त्यानंतर या व्यक्तीने समुद्रात उडी मारली. यावेळी टॅक्सी चालकाने या व्यक्तीला रोखण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला समुद्रातून बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com