Bandra Terminus Stampede: चेंगराचेंगरीनं वांद्रे स्टेशन हादरलं; थरकाप उडवणारा थरार, राजकारण तापलं

Bandra Terminus Stampede: आता बातमी येतेय मुंबईतून. मुंबईत वांद्रे स्टेशनवर पहाटे पहाटे चेंगराचेंगरी झालीय. यामध्ये 9 जण जखमी झालेयत. मात्र, यावरून आता राजकारण तापलंय. पाहुयात हा रिपोर्ट.
Bandra Terminus Stampede: चेंगराचेंगरीनं वांद्रे स्टेशन हादरलं; थरकाप उडवणारा थरार, राजकारण तापलं
Bandra Terminus Stampede
Published On

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

मुंबईतील वांद्रे टर्मिनस पहाटे पहाटे प्रवाशांच्या किंचाळ्यांनी हादरून गेलं.पहाटे 5 वाजून 10 मिनिटांची वेळ. वांद्रे गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आली आणि प्रवाशांची झुंबड उडाली.प्रत्येकजण ट्रेनमध्ये शिरण्यासाठी प्रयत्न करत होता.गर्दी एवढी भयंकर होती, की काही कळायच्या आतच चेंगराचेंगरी झाली. आणि प्रवाशांच्या किंचाळ्यांचा आवाज फक्त ऐकू येत होता.

कुणाचा हात दबला गेला, तर कुणाचा पाय दबला गेला.कुणी खाली पडलं, तर कुणाचा श्वास कोंडला. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले. त्यातील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या गाडीतून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात.दिवाळी आणि छट पूजा हे सण उत्तरेतील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी असेच प्रवासी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर गेले होते. मात्र ही रेल्वे उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली.यावरून आता राजकीय वातावरण तापलंय.

संजय राऊत आणि जयंत पाटलांनी तर थेट रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधलाय.रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.तर रेल्वे मंत्री प्रचारासाठी फक्त मुंबईत येतात त्यांना मुंबईकरांच्या सुविधेशी काही देणंघेणं नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे या चेंगराचेंगरीवरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालंय.असो, निवडणुका आहेत, त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर टीका करतील...मात्र, यांच्या टीकेत सामान्य माणूस भरडला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com