Badlapur Video Fact Check: बदलापूर वांगणीचा तो VIDEO खरा आहे की नाही? उत्तर मिळालं!

Badlapur Video Viral Fact Check: बदलापूर वांगणीचा तो VIDEO खरा आहे की नाही? उत्तर मिळालं!
Badlapur Video Viral Fact Check
Badlapur Video Viral Fact CheckSaam TV
Published On

>> सचिन गाड

Badlapur Local Train Video Viral Fact Check:

सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत प्रचंड गोंधळ होत असल्याचं दिसत आहे. एक आरपीएफ कॉन्स्टेबलही लेडीज डब्ब्यात दिसतो. या व्हिडीओनंतर सगळेजण या व्हिडीओसोबत आलेला व्हायरल मेसेजही वाचत आहेत. त्या मेसेजमध्ये काय लिहिलंय, ते आपण जाणून घेऊ. यासोबतच या मेसेजही सत्यता नेमकी काय आहे? हा सगळा प्रकार खरा आहे की खोटा आहे, त्याचीही पडताळणी करूयात.

व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलंय?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिलं आहे की, ''हा व्हिडीओ दोन आठवड्यापूर्वीचा आहे. यात एक बाई आणि तिची मुलगी बदलापूर ट्रेनमध्ये डाउन मारून आल्या. तर बदलापूर मधील काही बायकांनी त्या मुलीवर आणि तिच्या आईवर मारहाण केली आणि तिच्या आईला ट्रेन मधून बाहेर काढला. त्यानंतर त्या मुलीला पण बाहेर काढलं. पण तिच्या आईची परिस्तिथी खूपच बिकट झाली होती. तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता. त्यातूनच तिच्या आईने स्वतःचा जीव गमावला. '' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Badlapur Video Viral Fact Check
Explainer: अदानींच्या संपत्तीत गेल्या 8 दिवसात आश्चर्यकारक वाढ, यामागचं नेमकं कारण काय?

यात पुढे लिहिलं आहे की, ''दुर्दैवाची गोष्ठ ही आहे की, पोलीस तिथे असताना सुद्धा हे सगळं झालं. हे खूपच भयानक आहे. आपण रोज ट्रेन मधून प्रवास करतो. लोक अशीच वागत राहिली तर कोणाचा ही असा जीव धोक्यात येऊ शकतो. भांडण करण्यापेक्षा थोडं शांत डोकं ठेवलेलं तर, हे सगळं होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या दोन बायकांना अटक झाली आहे. पण अशा लोकांना कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. माझ्या माहितीनुसार, ती ट्रेन 8.10 सकाळची होती. ती ट्रेन बदलापूरमध्ये 3 नंबर प्लॅटफॉर्मवर लागते. म्हणजे ती ट्रेन वांगणी कारशेट इथून निघते त्यामुळे ट्रेन मध्ये चढलेली व्यक्ती ही त्या वांगणी वस्तीमध्ये राहणारी असावी. जर एखादी व्यक्ती डाउन करून आली म्हणून त्या व्यक्तीशी असं वागणं खूपच चुकीचं आहे.'' (Latest Marathi News)

दरम्यान, या संपूर्ण व्हायरल व्हिडीओनंतर आम्ही रेल्वे पोलीस, प्रवासी संघटना आणि स्थानिक सूत्रांशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या व्हिडीओबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली. साम टीव्हीचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी रेल्वे पोलिसांकडे या व्हिडीओबाबत विचारणा केली. त्यानंतर महत्त्वपूर्ण खुलासे पोलिसांनी साम टीव्हीकडे केले. त्यातून हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, नेमकी ही घटना काय आहे? आणि खरंच त्या आईला आपला जीव गमवावा लागला का? याबाबतही महत्त्वाचा खुलासा समोर आलाय.

नेमका हा व्हिडीओ कधीचा?

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही 8 नोव्हेंबरची घटना

व्हायरल मेसेज पूर्ण खोटा?

पूर्णपणे नाही, पण काही गोष्टी धादांत खोट्या आहेत.

नेमकं काय घडलं?

ठाणे जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोव्हेंबर महिन्यातली. कारशेडमधून काही महिलांनी गाडी पकडली. गाडी आधी बदलापूरला गेली. तिथून सीएसएमटीच्या दिशेने रवाना झाली. रिटर्न चढल्यामुळे सीटवरुन भांडणं झाली. भांडण इतकं वाढलं की पोलिसांना कळवावं लागलं. याचदरम्यान महिला बेशुद्ध पडली. पोलिसांनी ठाण्याला या महिलेला उतरवलं. तक्रार देण्यासंदर्भात विचारणा केली. पण महिलेने तक्रार न देताच ती पुढे दादरच्या दिशेने निघाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यातला असल्याची बाब समोर आलीय. बेशुद्ध महिलेचा जीव गेला नसून ती जिवंत असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओसोबत शेअर करण्यात आलेला मेसेज साम टीव्हीच्या पडताळणीमध्ये खोटा असल्याचं समोर आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com