बदलापूर पालिका पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज; २ नव्या स्पीडबोट खरेदी

बोट चालवण्यासह रेस्क्यू ऑपरेशनचा सराव
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv
Published On

बदलापूर - बदलापूर (Badlapur) पालिकेकडून शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरपस्थितीला तोंड देण्यासाठी २ नव्या स्पीडबोट खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बोटींसह इतर बोटींचा सराव आणि रेस्क्यू ऑपरेशनचं मॉकड्रील बदलापूर पालिकेकडून करण्यात आलं. बदलापूर शहर हे उल्हास नदीच्या किनाऱ्यावर वसलं असून दरवर्षी पावसाळ्यात उल्हास नदीला पूर येतो.

हे देखील पाहा -

हे पुराचं पाणी दरवर्षी बदलापूर पश्चिमेच्या सखल भागात घुसत असल्यानं शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीत नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी, त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी बदलापूर पालिकेकडे आत्तापर्यंत ४ रबर बोट, २ फायबर बोट, १०० लाईफ जाकेट, ५० लाईफ रेस्क्यू रिंग, ५० हवेच्या ट्यूब, पाण्यावर तरंगणारे स्ट्रेचर हे साहित्य होतं. यंदा यात भर म्हणून २ नवीन स्पीडबोट पालिकेनं खरेदी केल्यायत. या स्पिडबोट कशा चालवाव्यात, याचं प्रशिक्षण बदलापूर पालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना देण्यात आलं. यासोबतच जुन्या बोटींचा सराव देखील करण्यात आला.

Badlapur News
दोंदवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी...

तर पूरपरिस्थितीत नागरिकांना कसं वाचवावं, याचं मॉकड्रील सुद्धा बदलापूर पालिका आणि अग्निशमन दलाकडून करण्यात आलं. बदलापूरच्या बॅरेज डॅम परिसरात उल्हास नदीत हा सराव करण्यात आला. यावेळी बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने हे स्वतः उपस्थित होते. उल्हास नदीला दरवर्षीच पूर येतो, मात्र यंदा पालिका पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आधीपेक्षा जास्त सुसज्ज असल्याचं यावेळी मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com