मुंबई: एनसीबीनं (NCB) आर्यन खान प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. बॉलिवुड अभिनेता शाहरुख (Shahrukh Khan) खान याचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) ८ ते १० लोकांना ताब्यात घेलल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede NCP) यांनी दिली होती. मात्र ताब्यात घेतलेल्या १० पैकी २ लोकांना सोडून देण्यात आलं होतं आणि त्यातला एकजण हायप्रोफाईल भाजप नेत्याचा मेहुणा असल्याचा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी काल केला होता. आज दुपारी १२ वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ पुराव्यांसह त्या भाजप नेत्याचं नाव जाहिर केलं आहे. (Ayran Khan Case: Nawab Malik reveals 'that' three names, makes serious allegations against NCB)
हे देखील पहा -
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली की, ''आमच्या माहितीनुसार सकाळी अकरा लोकांना ताब्यात घेतलं आणि नंतर बातम्या आल्या आठ लोकांना ताब्यात घेतलं. या अकरा लोकांपैकी तीन लोकंना सोडण्यात आलं. ते तिन लोकं रिषभ सचदेव (Rishabh Sachdev), प्रतीक गाभा (Pratik Gabha) आणि आमिर फर्निचरवला (Aamir Furniturewala) हे आहेत. यात रिषभ सचदेवा हा मुंबई भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कँबोज-भारतीय (mohit kamboj-Bhartiya) यांचा मेहुणा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील नेत्यांच्या शिफारसीनुसारच या तिघांना सोडण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून एनसीबीला प्रश्न केला की, 1300 लोक असलेल्या जहाजावर रेड टाकली, त्यात 11 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांना एनसीबी कार्यालयात आणलं, त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आलं. मग या तीन लोकांना सोडण्यासाठी कुणाचे फोन आले?याचा खुलासा समीर वानखेडे (Samir Wankhede NCB) यांनी करावा असं आव्हान मलिक यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले की, सगळा तपास व्हॉट्सअॅप चॅटवर सुरु आहे. या तिघांचे ह्याचे मोबाईल तपासले का? प्रविण दरेकर म्हणतात, माहिती एनसीबीला द्या. पण जे फ्रजीवाडा करतात त्यांना माहिती कशी द्यायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कमिशन बसवण्याची मागणी
नवाब मलिक यांनी हे प्रकरण तपासण्यासाठी कमिशन बसवण्याची मागणी केली. तसंच एनसीबीने सांगावं कोणत्या नेत्यांचा फोन आला? तीन लोकांना का सोडलं? असे अने प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे आर्यन खानकडून काहीही मिळालं नसून हा फ्रजीवाडी आहे असा आरोप त्यांनी एनसीबीवर केला आहे. मूनमून केसमध्ये पंचनाम्यात भानुशालीचा पत्ता वेगळा आणि आर्यन खान पंचनाम्यात पत्ता वेगळा असा आरोप करत पुढचं टार्गेट शाहरुख आहे हे आधीच ठरलं होतं, हे सगळ्या मीडियाला माहित आहे असा दावाही त्यांनी केला. प्रतीक गाभा आणि फर्निचरवला आर्यन खानचे मित्र आहेत आणि त्यांनीच आर्यनला आणले मग या दोघांना सोडण्यात आले अशी माहिती मलिक यांनी दिली.
मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
फरारी आरोपी पंच कस केलं? भानुशालीची पार्श्वभूमी गंभीर आहे. मुंबई पोलीसांनी सगळे व्हिडिओ मागवावे आणि आम्ही जे सांगतो ते तपासून पाहावं अस आव्हान मलिक यांनी केलं. तसेच मोहित कँबोजचे संबंध अनेकांशी आहेत, कोण-कोणत्या नेत्यांनी फोन केले हे समोर येईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करेन असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.