सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे नंतर कोकणच्या विकासात महत्वाची भूमीका ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे (Chipi Airport) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेमचेंजर तसेच गोवा विमानतळाला (Goa Airport) पर्याय म्हणूनही सध्या चिपी विमानतळाकडे पाहीलं जातंय. दुपारी १ वाजता या विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे देखील उपस्थित रहाणार आहेत त्यामुळे राजकिय वर्तुळात या उद्धघाटन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. (Chipi Airport: BJP will boycott the inauguration ceremony as no opposition leaders were invited)
हे देखील पहा -
नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे (Jyotiraditya scindia) या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित रहाणार की ते व्हीसी मार्फत या कार्यक्रमाला उपस्थित रहातायेत हे देखील पहावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज सकाळी ११ वाजता एअर अलायंन्सच्या पहिल्या प्रवासी विमानाने मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय नारायण राणे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि राज्यातील इतर मंत्री प्रवास करणार आहेत. चीपी विमानतळावर या पहिल्या प्रवासी विमानाचं दुपारी १२ वाजता आगमन होणार आहे. त्यावेळी मोठा जल्लोष देखील होणार आहे. दरम्यान चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय मानपमान तसेच श्रेयवादाची रस्सीखेच देखील पहायला मिळणार याची चुणूक गेले आठवढाभर कोकणात सुरू असलेल्या पोस्टर वॉरवरून दिसून येते.
भाजपचा बहिष्कार, राणे मात्र हजर राहणार
आज चिपी विमानतळाचं लोकार्पण आहे. या लोकार्पण च्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या नंबरला असल्यामुळे काल पत्रकार परिषदेमध्ये विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी (Pravin Darekar) नाराजी व्यक्त करून दाखवली होती. तसेच या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रविण दरेकर या दोघांनाही देण्यात आलेले नाही. प्रविण दरेकर यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार (Boycott) टाकणार आहे, मात्र नारायण राणे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
चिपी विमानतळावरील विमानांचे उड्डाण वेळापत्रक
बुधवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भूजहून येणारे '9 आय 661' क्रमांकाचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक ऑफ घेईल. हे विमान विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल.
विमानाचा '9 आय 661' सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.
सिंधुदुर्गातून शहरात जाण्यासाठी 'अलायन्स एअर' चे 70 आसनी एटीआर 72-600 विमान तैनात राहणार आहे.
उद्घाटनाच्या दिवशी मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे 2,520 आहे तर सिंधुदुर्ग मुंबई प्रवासासाठी 2,621 रुपये असेल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.