वसई/विरार : वसई-विरार (vasai virar) शहरातील रिक्षाचालकांनी अचानक रिक्षाच्या भाडयात वाढ केली आहे. यामध्ये किमान भाडे (पहिला टप्पा) हे ३५ रुपये करण्यात आले आहे. तर शेअर रिक्षाचे (rickshaw) किमान भाडे (fare) हे १५ रुपये करण्यात आले आहे. पेट्रोल महाग झाल्याने दरवाढ केल्याचे रिक्षा संघटनांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान वसईतील बहुतांश रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या असूनही त्यांनी दरवाढ (vasai virar rickshaw fare) केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (vasai virar rickshaw fare latest marathi news)
नवीन दरपत्रकानुसार भाडय़ात ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेअर रिक्षामधील किमान भाडे हे १० रुपयांऐवजी १५ रुपये तर विशेष भाडे किमान ३० रुपयांवरून ३५ रुपयांवर करण्यात आले आहे.
RTO यांनी प्रतिसाद दिला नाही
अनेक ठिकाणी विशेष भाडे हे ४० ते ८० रुपये एवढे वाढविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच रिक्षाचालक काेरोना काळात निर्बंध शिथिल असतानाही केवळ दोन प्रवासी बसवून प्रत्येकी ४० रुपये घेत होते. आता त्यांनी अचानकपणे भाडेवाढ केली आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) दशरथ वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
इंधनाचे दर वाढल्याने केली भाडेवाढ : रिक्षा संघटना
पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे रिक्षाच्या भाड्यात वाढ करावी लागली असे प्रेमशंकर गुप्ता (विभागीय अध्यक्ष, रिक्षा संघटना) यांनी नमूद केले. ते म्हणाले प्रत्येक रिक्षाचालकाला विमा, परवाना नूतनीकरण, पीयूसी तसेच रिक्षा विकत घेताना वस्तू सेवा कर यासाठी मोठा खर्च होतो. वर्षांला प्रत्येक रिक्षाचालकांला या विविध करापोटी २५ हजार रुपये भरावे लागतात. सन २०१७ नंतर प्रथमच ही भाडेवाढ झालेली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.