मुंबई: हनुमान चालिसा वरुन राज्याच्या राजखारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आज यावरुन शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेवर टीका केली. या टीकेला भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचं हिरवंकरण करुन टाकलं, अशी टीका अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली.
काल हनुमान जयंतीनिमित्त मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी, हिंदुत्व रक्तात असाव लागत, अशी टीका भाजपवर केली होती. यावर प्रत्युत्तर देताना भातखळकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे हिंदुत्व रक्तात असावं लागत, हे वाक्य त्यांनाच लागू होतं कारण ते पाहिजे तेव्हा हिंदुत्व वापरायचं आणि पाहिजे तेव्हा सोडायचं हा प्रयत्न ते करत आहे, असं भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले.
जेम्स लेन प्रकरणावर बोलताना भातखळकर म्हणाले, जेम्स लेनचं पुस्तकं प्रसिध्द झालं त्यावेळी या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी बाबासाहेब पुरंदरे यांनी केली होती. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची माफी मागावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. 'काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जी टिका करायची तीच टीका संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर करत आहेत. राष्ट्रपती लागवट लागायची काहीच शक्यता नाही, असंही भातखळकर म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.