KDMC: शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा प्रताप! KDMCच्या पथकावर रिव्हॉल्वर रोखली, दांडक्याने बेदम मारहाण

KDMC Officers Threatened with Revolver: अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका पथकावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि त्याच्या साथीदाराने केला आहे.
KDMC
KDMCSaam
Published On

कल्याणजवळील वडवली येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका पथकावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्याचा मुलगा वैभव पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

६५ बेकायदा इमारत प्रकरणानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे .गेल्या तीन महिन्यांत केडीएमसीने अनेक बांधकाम भुईसपाट केली आहेत. कल्याण जवळील वडवली येथे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयातील पथकाला मिळाली होती.

KDMC
Beed News: आधी बायकोनं जीव दिला, नंतर नवऱ्यानं झाडाला लटकून आयुष्य संपवलं; २ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

या माहितीनुसार, अ प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, अधीक्षक शिरीष गर्गे यांच्यासह आशिष टाक ,विलास साळवी ,रमेश भाकरे आणि इतर कर्मचारी कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. या अनधिकृत बांधकामाची पाहणी करत असताना त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचा मुलगा वैभव पाटील आपल्या साथीदारांसह पोहचले.

KDMC
Viral: भररस्त्यात टॉवेल गुंडाळून आली अन् आंघोळही केली; शेवटी सगळ्यांसमोर टॉवेल काढला अन् मग..VIDEO व्हायरल

पाटीलने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास कडाडून विरोध केला. अधिकारी,कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी केडीएमसीच्या पथकासोबत असलेल्या वाहनांच्या काचाही फोडल्या. दुर्योधन पाटील यांच्या दहशतीमुळे केडीएमसीचे कर्मचारी अधिकारी यांनी तेथून काढता पाय घेतला. या आधी देखील दुर्योधन पाटील याने केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत मारहाण केली होती.

याप्रकरणी अ प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास गेलेल्या केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने, आता केडीएमसी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केडीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी दुर्योधन पाटील यांनी प्रतिक्रिया देत आरोप फेटाळून लावलेत. केडीएमसी अधिकारी मारहाण प्रकरणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले .पाटील यांनी सांगितले की माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत,मी रिव्हॉल्वर काढलेली नाही,राजेंद्र साळुंके हा प्रत्येक घरामागे मागत होता त्यावरून वाद झाला ,जुन्या घरांवर फक्त पैशांसाठी कारवाई केली जाते ..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com