- सिद्धेश म्हात्रे
Maharashtra ATS : नवी मुंबई (Navi Mumbai) येथील पनवेल नजीक पीएफआय (Popular Front Of India) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या चार जणांना दहशतवाद विरोधी पथकानं (एटीएस) ताब्यात घेतलं आहे. एटीएसनं ही कारवाई पहाटे चार वाजता केली आहे. या सर्वांवर मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
या कारवाईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सचिव आणि संघटनेचे तीन सदस्यांना पनवेल येथून ताब्यात घेत त्यांना अटक (arrest) करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्राल्याने या संघटनेवर बंदी घातली आहे. तरीही पीएफआय संघटनेच्या बैठका सुरु असल्याची माहिती एटीएसला मिळाली. (PFI Latest Marathi News)
या माहितीच्या आधारे एटीएसनं (ats) पीएफआय पनवेलचे सचिव आणि तिघांना ताब्यात घेतलं. यामध्ये अब्दुल रहीम सय्यद या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. या सर्वांवर मुंबई येथील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.