मुंबईमधील अटल सेतूवर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. सेतूवरुन उडी मारुन या व्यक्तीने आत्महत्या केलीय. या घटनेचे दृश्य पुलावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरम्यान करणाऱ्या व्यक्तीचं वय ३८ वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव कारुतुरी श्रीनिवास, असे आहे. श्रीनिवास हा अभियंता होता आणि तो आर्थिक अडचणीत होता असं सांगितलं जात आहे. कारुतुरी श्रीनिवास हा डोंबिवलीतील पलावा शहरातील रहिवाशी आहे. तेथे तो पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलीसोबत राहत होता. दरम्यान श्रीनिवासच्या मृतदेह शोधण्यासाठी न्हावा शेवा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. श्रीनिवास पुलावरुन उडी घेत असल्याचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, श्रीनिवास दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अटल सेतू पुलावर जीप कार घेऊन येतो. रस्त्याच्या एका बाजुला कार थांबवतो. कारमधून खाली उतरतो. कारचा दरवाजा बंद करतो. त्यानंतर पुलाच्या कढड्याकडे जातो. त्यानंतर कोणाला काही कळण्याआधी त्याने थेट समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. याप्रकरणी पुलावरील टोल नियंत्रण कक्षाने न्हावा शेवा पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली. हाती आलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती इंजिनिअर असून तो आर्थिक अडचणीत होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
श्रीनिवासने बी. टेकची पदवी घेतली होती. तो कुवैतमध्ये नोकरीला होता. मागील २०२३ वर्षी तो भारतात परतला त्यानंतर त्याने लोढा ग्रुपमध्ये नोकरीला लागला. काहीवेळी लोढा ग्रुपसोबत काम केल्यानंतर त्याने ती नोकरी सोडली आणि तो स्वत: इलेक्ट्रिकल कंत्राट घेऊ लागला. त्याच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, श्रीनिवास कुवेतमध्ये असतानाही त्याने स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला वेळीच मदत मिळाली होती. मंगळवारी रात्री एका नातेवाईकाशी श्रीनिवासचं शेवटचं बोलणं झालं, त्यावेळी तो खूप नॉर्मल वाटत होता, असं श्रीनिवासच्या पत्नीने पोलिसांना आपल्याला जबाबात सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.