Navab Malik : पिक्चर अजूनही बाकी असेल तर... मलिकांना शेलारांचे प्रत्युत्तर

'सत्तेतील लोक क्रांती रेडकर यांची बदनामी करत आहेत.'
Navab Malik/Ashish Shelar
Navab Malik/Ashish ShelarSaamTV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : नवाब मलिक (Navab Malik) यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. तसेच त्यांचे डायलॉग पादर फुसके आहेत. तसेच अजून जर पिक्चर बाकी असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की, 'चल हट हवा येऊ द्या.' अशा फिल्मी अंदाजात भाजपा नेते आशिष शेलारांनी (Ashish Shelar) मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार पत्रकारांशी म्हणाले 'क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी आपली व्यथा मांडली आहे. पण सत्तेतील लोक क्रांती रेडकर यांची बदनामी करत असल्याचा आरोपही यावेळी शेलारांनी केला आहे. तसेच परिवहन मंत्री हे परिवार मंत्री झाले असून हे सरकार अकार्यक्षम झालं आहे असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ड्रॅग करून रिपोर्ट टाकला होता मग नवाब मलिक यांनी देखील ड्रग टेस्ट Drug test करून दाखवावं तेसच संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या मानसिक द्वंधाचे प्रदर्शन करत आहे किरीट सोमय्यायांना सत्तेतील लोकं इतकी का घाबरत आहेत असेही शेलार म्हणाले. शिवसेना इतकी घाबरलेली आहे की, निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेसाठी प्रस्ताव हा घाईघाईने आणला आणि आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नंतर अहवाल लिहिण्यात आलं असल्याची टीका ही त्यांनी केली. तसेच 'माझं शिवसेनेला खुले आव्हान आहे की ते 23 तारखेनंतर आयुक्त कार्यालयात तसेच आयुक्तांच्या दालनातील सीसीटीव्ही CCTV फूटेज सार्वजनिक कराव्यात असही ते म्हणाले.'

Navab Malik/Ashish Shelar
ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी- गोपीचंद पडळकर

क्रांती रेडकर या आमच्या मराठी भगिनी बद्दल मी काही बोलणार नाही. पण त्या आमच्या मराठी भगिनीवर राष्ट्रवादीचे लोक काय काय टीका आणखी काय काय बोललंत आहे तो त्यांचा अधिकार आहे असही ते म्हणाले. मुळात संजय राऊतांच्या मनांत द्वंद चालु आहे पवार आहेत की ठाकरे आहे. त्यांना आधी ठरवू द्या मग आपण बोलू असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com