मुंबई: काल विधिमंडळाच्या बाहेर सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली होते. त्यानंतर आज भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि निलंबीत आमदारांच्या मुद्द्यावर बोलले. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की १२ आमदारांच निलंबन रद्द झालंय, सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष यांनी काल मान्य केलं आहे. आम्ही आमच्या न्यायीक लढाईने ते मिळवलं आहे. निलंबनाचा तुमचा ठराव अवैध, तर्कहीन असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने घोषीत केलं आहे. सभापती, उपसभापती, उपाध्याक्ष, राष्ट्रपतींना (President Of India) भेटले आणि मागणी केली. संविधानाच्या कलम १४३ नुसार राष्ट्पतींनी सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भासाठी पाठवावा अशी मागणी केली असल्याचं आशिष शेलारांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले राष्ट्रपती महोदयांना भेटणं यावर आम्हाला काही बोलायचं नाही, पण यात स्पष्टता आणणं गरजेचं आहे. या मांडणीमुळे कुणाला धुरळा आणि धूर उडता कामा नये, म्हणून आम्हाला आमची बाजू मांडायची आहे. "सन्माननीय उपाध्यक्ष , सभापती , उपसभापती एका वाक्यात नम्रतेने सांगायचं झालं तर तुमची वेळ गेली, संधी गमावली, आणि मागणी चुकली असंच म्हणणं आहे".
काल पत्रकार परिषद घेणारं विधिमंडळ, या विधिमंडळाला नस्तीसहित कोर्टाने आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस दिली होती. पण त्यांनी मांडली नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जाणार नाही अशी भूमिका घेतली, त्यामुळे वेळ गेली. संधी होती तेव्हा मांडलं नाही, मग आता राष्ट्रपतींकडे जायची वेळ गेली , आणि अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले तेव्हा न्यायालय म्हणालं होतं, १२ सदस्यांनी विधिमंडळासमोर जावं, तिथे निर्णय झाल्यास सर्वोच्च न्यायालय मध्ये येणार नाही. पण काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, त्यामुळे तुम्ही संधी गमावली अससल्याचं म्हणत आशिष शेलारांनी आपली बाजू मांडली.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.