इम्रान ताहिर- अनसोल्ड
अमित मिश्रा- अनसोल्ड
........................................
कुलदीप यादव
तीन विदेश फिरकी गोलंदाजां डावलून कुलदीप यादववरती बोली लावली आहे. दिल्लीच्या संघाने त्याला विकत घेतले आहे. २ कोटी रुपयांत दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले आहे.
राहुल चहर- (PBKS)- ५.२५ कोटी
राहुल चहरवरती फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधीक बोली लावली आहे. दिपक चहर वरती वेगवान गोलंदाज तर त्याचा भाऊ राहुलवरती फिरकी म्हणून मोठी बोली लावली आहे. पंजाब किंग्सच्या संघाने ५.२५ कोटी रुपयांत विकत घेतले आहे.
युजवेंद्र चहल- (RR) - ६.५० कोटी
चहलकडे एक प्रतिभावान फिरकी गोलंदाज म्हणून पाहिले जाते. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. आणि त्याने आयपीएलमध्येही चांगली गोलंदाजी केली आहे. मागच्या हंगामात तो आरसीबीच्या संघाचा भाग होता. त्याला संघाने रिटेन केले नव्हते, म्हणून त्याच्यावर मोठी बोली लागली आहे.
दिपक चहर- (CSK) - १४ कोटी
चेन्नईच्या संघाने रिटेन केले नव्हते. आता दिपक चहरवर मोठी बोली लावली आहे. दिपक चहरने नुकत्याच झालेल्या काही सामन्यात चहरने आपल्या बॅटनेही कमाल दाखवली आहे. चहर या पावरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतो, आणि त्याच्या फलंदाजीमध्ये झालेला सुधार हा नक्कीच संघांना आकर्षीत करणार ठरला आहे. (Deepak Chahar Auction Prize)
टी-नटराजन- (SRH) - ४ कोटी
टी-नटराजनकडे यॉर्कर किंग म्हणून पाहिले जाते. त्याने आपल्या यॉर्कने भल्या भल्या फलंदाजांना नाचवले आहे. मागच्या हंगामात त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. मागच्या हंगामातो हैद्राबादच्या संघात होता. आताही त्याला हैद्राबादने त्याला ४ कोटी रुपयात घेतले आहे.
प्रसिद्ध कृष्णा- (LSG) - १० कोटी
वेस्ट इंडिजसोबत झालेल्या दौऱ्यात आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णावरती मोठी बोली लागली आहे. प्रसिद्ध कृष्णा मागच्या हंगामात केकेआर संघाचा भाग होता. आता त्याला राजस्थान रॉयल संघाने विकत घेतले आहे.
शार्दुल ठाकुर- (DC)- १०.७५ कोटी
शार्दुल ठाकुर मागच्या हंगामात चेन्नईच्या संघात होता. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. शार्दुलकडे विकेट टेकर म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर तो वेळेला फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लागली आहे. भारतीय संघात खेळत असताना शार्दुलने सर्वांनाच प्रभावीत केले आहे. त्याला १०.७५ कोटी रुपयांना दिल्लीने विकत घेतले आहे.
भुवनेश्वर कुमार- (SRH)- ४.२ कोटी
मार्क वुड- (LSG)- ७.५ कोटी
लॉकी फर्ग्युसन- (GT) - १० कोटी
जोश हेजलवुड- (RCB)- ७.७५ कोटी
उमेश यादव- अनसोल्ड
निकोलस पुरण- (SRH)- १०.७५ कोटी
वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरणवरती मोठी बोली लावली आहे. पुरणला हैद्राबादच्या संघाने १०.७५ कोटी रुपयाला विकत घेतले आहेत. तो आजच्या दिवसातील १० कोटीच्या वरती बोली लागलेला ४-५ खेळाडू आहे.
जॉनी बेअरस्टो- (PBKS)- ६.७५ कोटी
वृद्धमान शाह- अनसोल्ड
सॅम बिलिंग्स- अनसोल्ड
इशान किशन (MI)- १५.२५ कोटी
मागच्या हंगामात मुंबईच्या संघाचा भाग असलेल्या इशान किशनला यावेळेस मोठी बोली लागली आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मोठे मोठे फटके मारण्यात तो माहिर आहे. मुंबई आणि पंजाबचा संघाने त्याला घ्यायला पुढाकार घेतला होता. इशान किशन हा आजच्या दिवसातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी युवराज सिंगला १६ कोटी रुपयांत विकत घेतले होते.
अंबाती रायडू- (CSK)- ६.७५ कोटी
अबाती रायडू हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. मधल्या फळीत तो चांगली फलंदाजी करतो. चेन्नईच्या संघात असताना त्याने चांगली फलंदाजी केली होती. आता त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले आहे. ६.७५ कोटी रुपयांत विकत घेतले आहे.
मॅथ्यू वेड- अनसोल्ड
मोहम्मद नबी- अनसोल्ड
मिचेल मार्श- (DC)- ६.५ कोटी
दिल्लीच्या संघाने अष्टपैलू खेळाडू म्हणून मिचेल मार्शला आपल्या संघात घेतले आहे. विश्वचषक जिंकून देण्यात मिचेल मार्शचे फार मोठे योगदान आहे.
क्रुणाल पांड्या- (LSG)- ८.२५ कोटी
मुंबईमध्ये आपल्या खेळाचा करिश्मा दाखवणाऱ्या क्रुणालला मुंबईने रिटने केलेले नाही. त्याच्यावर मोठी बोली लागणार हे निश्चित होते. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला संघात घेण्यात आले आहे. लखनौ संघाने त्याला आपल्या संघात घेतले आहे. ८.२५ कोटी रुपयांत त्याला विकत घेतले आहे.
वॉशिंग्टन सुंदर- (SRH)- ८.७५ कोटी
वॉशिंग्टन सुंदरला हैद्राबादने आपल्या संघात घेवून आजच्या दिवसातील पहिली खरेदी केली आहे. ८.७५ कोटी रुपयांत सुंदरला विकत घेतले. त्याकडे एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जाते.
वनिंदू हसरंगा
हसरंगाने इतिहास घडवला आहे. श्रीलंकेचा एकमेव असा फलंदाज आहे ज्याला एवढी मोठी लावली आहे. १०.७५ कोटीला RCB ने विकत घेतले आहे.
Auctioneer Hugh Edmeades
श्रीलंकेचा खेळाडू वानिडू हसरंगा याला संघात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये चढाओढ दिसत असताना आयपीएलच्या मेगा लिलावात धक्कादायक प्रकार घडला. Auctioneer Hugh Edmeades हे अचानक जमीनीवर कोसळल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर लिलाव प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ब्रेकनंतर पुन्हा लिलाव सुरु होणार आहे.
दिपक हुड्डा- (लखनौ) ५.७५ कोटी
हर्षल पटेल- (RCB)- ११ कोटी (Harshal Patel Auction Prize)
मागच्या हंगामातील पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलवर मोठी बोली लागली आहे. ११ कोटी रुपयांत आरसीबीच्या संघाने त्याला विकत घेतले आहे. मागच्या हंगामातही तो आरसीबीच्या संघाचा भाग होता.
जेसन होल्डर- (LSG)- ८.७५ कोटी
नुकत्याच झालेल्या मालिकेमध्ये होल्डरने हॅटट्रीक घेतली होती. तो फलंदाजीही चांगली करतो म्हणून त्याला मोठी बोली लावली आहे. तो आता लखनै संघाचा भाग असणार आहे.
नितीश राणा- (KKR)- ८ कोटी
ड्वेन ब्रावो- (CSK)- ४.४० कोटी
MR-T20 असलेल्या ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु तो लिग खेळत राहणार आहे. त्याला त्याच्या जुन्याच संघाने पुन्हा आपल्या गोटात घेतले आहे.
स्टीव स्मिथ- अनसोल्ड
सुरेश रैना- अनसोल्ड
देवदत्त पडिक्कल (RR)- ७.७५ कोटी
युवा फलंदाज एक चांगला सलामवीर असलेल्या देवदत्त पडिक्कलवरती मोठी बोली लावण्यात आली आहे. मागच्या हंगामात तो RCB च्या संघाचा फलंदाज होता. त्याने एक शतकही झळकावले होते. यंदाच्या हंगामात तो राजस्थानच्या संघाचा भाग असणार आहे.
रॅबिन उथ्थपा- CSK- २ कोटी
जेसन रॉय- (GL) २ कोटी
शिमरन हेटमायर (RR)- ८.२५ कोटी
वेस्ट इंडिजचा विस्पोटक फलंदाज शिमरन हेटमायर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मागच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटलच्या संघाचा भाग होता. यंदाच्या हंगामात तो राजस्थानच्या संघाकडून खेळताना दिसेल.
मनिष पांडे (लखनौ)- ४.६ कोटी
विस्पोटक फलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी करुन संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या मनिष पांडेला नवीन संघ नखनौने आपल्या संघात घेतले आहे.
David Warner-(DC)- ६.२५ कोटी
वॉर्नरला दिल्लीच्या संघाने आपल्या संघात घेतले आहे. आपल्या आयपीएलमधील करियरची सुरुवात वॉर्नरने दिल्लीच्या संघाकडून केली होती.
क्विंटन डी कॉक (Quinton de kock)- (लखनऊ)- ६.७५ कोटी
क्विंटन डी कॉक मागच्या हंगामात मुंबईचा सलामवीर होता. त्याला संघाने रिटेन केलेले नाही. परंतु यंदाच्या हंगामात त्याला नवीन संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. लखनऊच्या संघाने त्याला ६.७५ कोटी रुपयांत विकत घेतले आहे.
फाफ ड्यू प्लेसीस (RCB)- ७ कोटी
RCB च्या संघाला कर्णधाराची गरज होती. कदाचीत कर्णधाराचा एक चांगला पर्याय म्हणून प्लेसीसला आपल्या संघात घेतले असावे. मागच्या हंगामात तो चेन्नईच्या संघाचा भाग होता.
मोहम्मद शमी (GL)- ६.२५ कोटी
शमी भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याने मागच्या हंगामात चांगली गोलंदाजी केली होती. ६.२५ कोटी रुपयांत त्याला गुजरातच्या संघाने विकत घेतले आहे. गुजरातच्या संघाला त्यांचा पहिला वेगवान गोलंदाज मिळाला आहे.
श्रेयश अय्यर (KKR)- १२ कोटी
श्रेयश अय्यरला कोलकाताच्या संघाने १२ कोटी रुपयांत विकत घेतले आहे. अय्यर मागच्या हंगामात दिल्लीच्या संघाचा भाग होता.
ट्रेंट बोल्ट (RR)- ८ कोटी
ट्रेंट बोल्ट आता राजस्थान संघाचा भाग असणार आहे. मागच्या हंगामात मुंबईच्या संघाकडून खेळणाऱ्या बोल्टने अतिशय चांगली कामगिरी केली होती. त्याला संघाने रिटेन केले नाही तेव्हा सर्वांनात आश्चर्याचा धक्का बसला होता.
कगिसो रबाडा (PBKS)- ९.२५ कोटी
पंजाबच्या संघाने कगिसो रबाडाला आपल्या संघात घेतले आहे. ९.२५ कोटी रुपयांना त्यांनी रबाडाला विकत घेतले आहे.
पॅट कमिन्स (KKR)- ७.२५ कोटी
कोलकाता संघाने पॅट कमिन्सला आपल्या संघात घेतले आहे. ७.२५ कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले आहे.
R.Ashwin (RR)- ५ कोटी
राजस्थानच्या संघाने आर. आश्विनला ५ कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे राजस्थानच्या संघाची गोलंदाजी नक्कीच बळकट होण्यास मदत होणार आहे.
शिखर धवन (पंजाब किंग्स)- ८.२५ कोटी
शिखर धवनला 8.25 कोटी रुपयांत पंजाब किंग्स (PBKS) संघाने विकत घेतले आहे. मयंक आग्रवालला त्याचा सलामविर जोडीदार मिळाला आहे. शिखर धवन यापुर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. शिखर धवनवरती मोठी बोली लावली जाणार हे निश्चीत होतं. (Shikhar Dhawan Auction Amount)
श्रेयश अय्यर, शिखर धवनस (Shikhar Dhawan), फाफ ड्यू प्लेसीस, इशान किशन यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता. कारण त्यांना पुर्वीच्या संघाने रिटेन केलेले नाही. मागच्या हंगामात या सर्व खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केली होती, तरीही त्यांना संघाने रिटेन केलेले नाही. श्रेयश अय्यर हा कर्णधाल होण्याच्या यादीत आहे, केकेआर, आरसीबी या संघांना चांगल्या कर्णधाराची गरज आहे.
हे संघ घेणार लिलावात सहभाग
मुंबई इंडियन्स
चेन्नई सुपर किंग्ज
कोलकाता नाईट रायडर्स
दिल्ली कॅपिटल्स
राजस्थान रॉयल्स
पंजाब किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
लखनौ सुपर जायंट्स
गुजरात टायटन्स
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.