अक्षय बडवे, प्रतिनिधी...
Ashadhi Wari Sohla 2023: विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यात मुक्कामासाठी आगमन झाले आहे. पुण्यातल्या संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या आहेत. या दोन्ही पालखीत वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे. लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्यानं पुण्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. आता पुण्यात या पालख्या मुक्कामी असणार आहेत.
पंढरीची वारी (Wari) म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. हरीनामाच्या गजरात आज जगतगुरू तुकोबाराया आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांनी आज पुण्याकडे (Pune) प्रस्थान ठेवले होते. या दोन्ही पालख्या आता पुण्यात दाखल झाल्या आहेत.
पुणेकरांनी मोठ्या भक्तीभावाने दोन्ही पालख्यांचे जल्लोशात स्वागत केले आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणे महापालिकेच्या वतीनं पाटील इस्टेट परिसरात दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी टाळ मृदूंगाच्या गजराने पुण्य नगरी दुमदूमून गेली होती. (Latest Marathi News)
या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येथे असणार आहे. पुणेकरांना उद्या दोन्ही पालख्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. (Ashadhi Wari Sohala Pune)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.