दादरमध्ये रंगकर्मींचे आंदोलन; कोरोना होऊन मेलेलं बरं, पण...

रंगकर्मी हा असंघटित आहे, माथाडी कामगारांच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी,
दादरमध्ये रंगकर्मींचे आंदोलन; कोरोना होऊन मेलेलं बरं, पण...
दादरमध्ये रंगकर्मींचे आंदोलन; कोरोना होऊन मेलेलं बरं, पण...

रामनाथ दवणे

रंगकर्मी हा असंघटित आहे, माथाडी कामगारांच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या रकमेत वाढ करावी, अशा एक ना अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातील रंगकर्मीनी मुंबईत दादर (Dadar) येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र पोलीसांनी या कलाकारांना ताब्यात घेतले आहे. विजय पाटकर, मेघा घाडगेसर रंगकर्मींना दादर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Artists held protest in Dadar against government)

दादरमध्ये रंगकर्मींचे आंदोलन; कोरोना होऊन मेलेलं बरं, पण...
पुण्यात परत मुळशी पॅटर्न; उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार

राज्य सरकारने 56 हजार रंगकर्मींना 5 हजार रुपये मानधन घोषित केले आहे. मात्र व्यावसायिक कलाकारांची नोंदणी न करता हे मानधन सरकार कसे देणार, असा सवाल विचारत कलाकार हे आंदोलन करत आहेत. यामध्ये विजय पाटकर, मेघा घाडगे, मिलींद दस्ताने, विनय गिरकर, संदेश उमप, उमेश ठाकूर, यांच्यासह अनेक कलाकार, बॅक स्टेज कलाकार, मिमिक्री आर्टिस्ट, ऑर्केस्ट्रा कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या

-कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या रकमेत वाढ करावी.

- रंगकर्मी हा असंघटित आहे, माथाडी कामगारांच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी.

- मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या कलाकरांना भाडेतत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी रंगकर्मींसाठी विश्रामगृहात सोय असावी.

- शासनाने रंगकर्मींसाठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडकोच्या घरांसाठीच्या संख्येत ५% ने वाढ करावी.

- निराधार वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी सोबतच त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.

- महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हापरिषद हॉस्पिटल मध्ये रंगकर्मींसाठी राखीव 'बेड असावेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com