Lalit Patil Plan: ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून नाशिकपर्यंत कसा पोहचला? संपूर्ण प्लान उघडकीस

Crime News: ललितला ससूनमधून पलायन करण्यास मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना याला अटक केली आहे.
Lalit Patil Plan
Lalit Patil PlanSaam TV
Published On

अक्षय बडवे

Lalit Patil:

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात मुंबईमधून आतार्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून ललितने पलायन केल्यानंतर ८ पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई झाली. अशात आता ससूनमधून पळताना ललितने कोणता प्लान आखला होता आणि त्याला यात कुणाची मदत मिळाली याबाबत माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lalit Patil Plan
Lalit Patil case: नाशिकमधून मुंबई पोलिसांनी जप्त केलं २० किलो एमडी; ललित पाटीलनं गिरणा नदीत फेकलं होतं ड्रग्ज

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ललित पाटीलचा पलायनाचा प्लान ससून रुग्णालयातच ठरला होता. ललित पाटील आणि विनय अऱ्हाना या दोघांनी मिळून हा प्लान बनवला होता. ललितला ससूनमधून पलायन करण्यास मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना याला अटक केली आहे.

ससूनमधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ललित आणि अऱ्हाना यांची ओळख झाली होती. २ ऑक्टोबर रोजी ललित ससून रुग्णालयामधून पळाला. पुढे तो काही अंतरावर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला. हॉटेलच्या बाहेरून त्याने रिक्षा केली आणि तो सोमवार पेठेत पोहचला. याठिकाणी दत्ता डोके हा ललितला घेऊन जाण्यासाठी मोटार घेऊन थांबला होता.

डोके अऱ्हानाकडे चालक म्हणून कामास आहे. या मोटारीतून ललित रावेतला पोचला. त्यानंतर डोकेने अऱ्हानाच्या सांगण्यावरुन ललितला १० हजार रुपये दिले. ललित पैसे घेऊन पहिल्यांदा मुंबईला गेला आणि तेथून नाशिकला पोहचला. पुढे नाशिकला गेल्यानंतर त्याने मैत्रिणीकडून २५ लाख रुपये घेतले आणि पुढचा प्लॅान बनवला.

ललित १६ नंबर वार्डमध्ये होता तेव्हा त्याला एका संशयित व्यक्तीने काळ्या रंगाच्या बॅगमधून मोबाईल फोन दिला होता. ललितने ससूनमधून पलायन केल्यावर महिला पोलीस शिपाई सविता हनुमंत भागवत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत २ आधिकार्यांसह ८ पोलिस शिपायांचं निलंबन झालं आहे. ललित पाटील पळून जाण्याच्या एक दिवस आधी एका संशयित इसमाने ससून रुग्णालयात त्याची भेट घेतली होती.

Lalit Patil Plan
Mumbai Crime News: बेवारस बॅगेत आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, मुंबईत खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com