- रश्मी पुराणिक
मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलेच तापले आहे. पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेना झुकणार नाही असे स्पष्ट आहे आहे. ट्विट करत संजय राऊत म्हणाले की, माझे शब्द अधोरेखित कर... मी पुन्हा एकदा सांगतो करतो बाप आणि मुला व्यतिरिक्त आणखी 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी आणि त्यांचे "वासुली एजंट" देखील तुरुंगात जातील असे म्हटले आहे.
राऊत यांनी किरिट सोमैया आणि त्यांचे पुत्र नील सोमैया यांच्यासंदर्भात हे ट्विट केले असल्याचे बोलले जात आहे. कालच कोर्टाने भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर राऊत यांनी हे ट्विट केले आहे आहे.
दरम्यान यादी देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असे म्हटले होते. ते नेते कोण याचा खुलासा मात्र अजूनही झालेला नाही. राऊत यांनी अजूनही कुणाचेही नाव घेतलेले नाही. ही नावे कुणाची या चर्चेला राऊत यांच्या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.