Pune News: पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; नारायणगावातून १० बांग्लादेशी घुसखोरांना पकडलं

Pune ATS Action: दहशतवाद विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगावात गुरुवारी (१४ डिसेंबर) अचानक धाड टाकली. यावेळी १० बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली.
Pune Bangladeshi Infiltrator ATS Action
Pune Bangladeshi Infiltrator ATS Action Saam TV
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे, १५ डिसेंबर २०२३

Pune Bangladeshi Infiltrator ATS Action

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगावात गुरुवारी (१४ डिसेंबर) अचानक धाड टाकली. यावेळी बांग्लादेशातून भारतात खूसघोरी करून आलेले १० बांग्लादेशी सापडले. या घुसखोरांना तातडीने अटक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Bangladeshi Infiltrator ATS Action
Unseasonal Rain Alert: पुढील ४८ तासांत गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून 'या' राज्यांना अलर्ट

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरासह (Pune News) जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोरांच्या वास्तव्याचं प्रमाण वाढलं आहे. पोलिसांकडून या घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहे. अशातच नारायणगावात बांग्लादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार गुरुवारी सकाळी एटीएसच्या (ATS) पथकाने नारायणगावात धाडसत्र सुरु केले. यावेळी पथकाला ८ बांग्लादेशी नागरिक आढळून आले. हे सर्व नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचं चौकशीत समोर आलं. दरम्यान, एटीएसने या घुसखोरांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे अवैध्यरित्या भारतात राहत असलेल्या बांग्लादेशी घुसखोराचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, पाच दिवसापुर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत पुणे, ठाणे परिसरात आयसीस मॉड्युलच्या संदर्भात कारवाई करत पंधरा जणांना ताब्यात घेतले होते.

तर कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता एटीएसने बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने देखील यापुर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी महिला आणि पुरुषांवर कारवाई करत त्यांना पकडले होते.

Pune Bangladeshi Infiltrator ATS Action
IND vs SA: कुलदीप यादवने रचला इतिहास, वाढदिवशीच ५ विकेट्स; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com