पुण्यात वैष्णवीनंतर दिव्याचाही गेला जीव, लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

Pimpri Chinchwad : वाकडमधील W-57 सोसायटीत दिव्या सूर्यवंशी यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला. ही आत्महत्या नसून खून असून, तिच्या पतीसह सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि खून केला असा आरोप केला आहे.
Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवडमध्ये 26 वर्षीय दिव्या सूर्यवंशीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.

  • दिव्याच्या माहेरच्या मंडळींचा आरोप – ही आत्महत्या नसून पती व सासरच्यांनी केलेला खून आहे.

  • दिव्याला सतत हुंड्यासाठी छळले जात होते, मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.

  • वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे

Pimpri Chinchwad woman found dead hanging : पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या छळामुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींवर याप्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिव्या हर्षल सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 सोसायटीत 26 वर्षीय दिव्या हर्षल सूर्यवंशी हिचा राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दिव्याचे पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि सासरच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दिव्याच्या माहेरच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, तिला सातत्याने हुंड्यासाठी छळले जात होते. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता. दिव्याचा पती आणि सासरच्या कुटुंबीयांनी तिचा खून केला आहे. यापूर्वीही पिंपरी-चिंचवड परिसरात हुंड्याच्या छळामुळे वैष्णवी नावाच्या तरुणीचा बळी गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक हुंडाबळीचा प्रकार समोर आला आहे.

Pimpri Chinchwad
Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

दिव्याच्या मृत्यूप्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दिव्याच्या कुटुंबांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सासरच्या मंडळींची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हुंडाबळीच्या घटनांवरून पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.

Pimpri Chinchwad
Ratnagiri : चिपळूणमध्ये भयंकर अपघात, पावसात थारने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com