मुंबई : कुख्यात गुंड सुरेश पुजारीवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Another Case Filed Against Notorious Goon Suresh Pujari For Ransom Case).
50 लाखांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल
नोव्हेंबर 2021 मध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मोबाईलवर आणि लँडलाईन नंबरवरफोन करून 50 लाखांची खंडणी (Ransom) मागितली होती. गुंड (Goons) सुरेश पुजारी (Suresh Pujari) सध्या मुंबई पोलिसा़च्या खंडणी विरोधी पथकांच्या ताब्यात आहे.
15 डिसेंबरला पुजारीला फिलिपिन्समधून अटक केली होती. मुंबई (Mumbai) च्या खंडणीविरोधी पथकाने साडेतीन वर्षाच्या अथक मेहनतीने पुजारीचा ठाव ठिकाणा काढला शोधून होता. खंडणीखोर गँगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात 20 डिसेंबर 2016 रोजी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली होती.
मुंबई आणि ठाण्यात त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.