मुंबई : बदल्या व वसूली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या सुरू असलेल्या सीबीआय CBI चौकशीला आता वेगळ वळण मिळालं आहे. या ना त्या पुराव्यामुळे देशमुखाच्या अडचणी वाढत असतानाच, हा अहवाल प्रसारमाध्यमांच्या Media हाती लागला. मात्र, हा अहवालच खोटा असल्याचे आता सांगण्यात येत आहे. Anil Deshmukh Clean chit report fake say CBI
या अहवालाने देशमुखांचं पारडं आता जड झाले असतानाचं हा अहवाल गोपनीय असून त्यातमधील मजकूर छेडछाड करून तो वायरल करण्यात आल्याचे सांगत, सीबीआयनं या प्रकरणातील हवा तर काढलीच पण हा गोपनीय अहवाल असल्याने गोपनितेचा भंग केल्याचे सांगत देशमुखाच्या वकिलाला Advocate अटक करून आणखी अडचणीत आणले आहे.
मागील तीन महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्या मागे लागलेला ईडी ED व सीबीआयचा ससेमिरा संपायचे काही नाव घेत नाही. न्यायालयाकडूनही Court दिलासा मिळत नसल्याने देशमुखाची पळता भूई थोडी झालेली आहे. अशातच सीबीआयचा PE अहवाल व्हायरल झाला. ज्यामध्ये आर. गुंजाल यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे याच्यात फार कमी वेळा भेट झाली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोशल मिडियावर देशमुखांना क्लिन चीट मिळाल्याची चर्चा रंगू लागली. Anil Deshmukh Clean chit report fake say CBI
हा अहवाल बाहेर माध्यमांमध्ये आल्यानंतर कुठे तरी अनिल देशमुखांना दिलासा मिळेल असे वाटत असतानाच, सीबीआयने हा अहवाल खोटा असल्याचे सांगत प्रकरणाची हवा काढून टाकली. एवढचं नाही तर हा गोपनीय अहवाल असल्याचे सांगत तो लिक केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याने देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली. या प्रकरणात सीबीआयने त्यांचा पोलिस उप निरीक्षक अधिकारी अभिषेक तिवारी व देशमुखांचे वकिल आनंद डागा यांना अटक केल्याने देशमुखांच्या गोटात अस्वस्थतात पसरल्याचं कळतं. सीबीआय आणि ईडीच्या चौकशीपासून कायद्याचा आधार घेत चौकशी टाळणारे देशमुख आता पुढे काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.