Thane News: नव्या प्रभाग रचनेमुळे अनेकांचे दणाणले धाबे..

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार चार सदस्यीय संख्येत घट होऊन तीन सदस्यीय झाली आहे
Thane News: नव्या प्रभाग रचनेमुळे अनेकांचे दणाणले धाबे..
Thane News: नव्या प्रभाग रचनेमुळे अनेकांचे दणाणले धाबे..- Saam TV
Published On

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार चार सदस्यीय संख्येत घट होऊन तीन सदस्यीय झाली आहे. या प्रभाग रचनेमुळे इच्छुकांसह आजी-माजी नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहेत. (Analysis of Thane Municipal Election Ward restructuring)

यात तीन सदस्यांमध्ये जर दोन महिलांसाठीचे आरक्षण (Reservation) पडले तर एका विद्यमान नगरसेवकाची दांडीगुल होणार असून, शेजारच्या प्रभागातून त्यांना आपले नशीब आजमावे लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रभाग रचनेनंतर (Ward) आता आरक्षणाची धाकधूक लागली आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Election) अनुषंगाने १ फेब्रुवारी रोजीला प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मागील निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग होते. त्यात नव्या प्रभाग रचनेनुसार तीन सदस्यीय पद्धत असल्याने पालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. या रचनेत अनेक प्रभागांची मोठ्या प्रमाणात तोडमोड करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रभाग अतिशय छोटे तर काही भले मोठे करण्यात झाले. अशातच आता आरक्षण कशा पद्धतीने पडणार याची चिंताही इच्छुकांना जाणवू लागली आहे.

Thane News: नव्या प्रभाग रचनेमुळे अनेकांचे दणाणले धाबे..
शेतकऱ्याचा नादच खुळा; दीड एकरात बनवली दोन कोटींची विहीर, कारण...

लोकसंख्येनुसार अनुसूचित जातींची (एससी) सर्वाधिक टक्केवारी असलेल्या १० प्रभागांमध्ये हे आरक्षण टाकले जाणार आहेत. अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४२ हजार ६९८ इतकी असून त्यांच्यासाठी तीन प्रभाग राखीव असतील. त्यातले दोन महिलांसाठी ठेवले जाणार आहेत. २०११ च्या लोकसंख्येनुसार एससींची लोकसंख्या १ लाख २६ हजार होती. त्यांच्यासाठी १४२ पैकी १० जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. त्यापैकी पाच जागा या महिलांसाठी असतील. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रभागातील एससी मतदारांची संख्या जाहीर केली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची धाकधूक इच्छुकांमध्ये लागली आहे.

अनेकांनी ठेवले देव पाण्यात...
तीन सदस्यीय पद्धत असल्याने विद्यमान तसेच इच्छुकांची मोठी कसरत होणार आहे. एका प्रभागात दोन नगरसेवक असताना त्या ठिकाणी दोन महिलांचे आरक्षण पडल्यास एकाला माघार घ्यावी लागणार आहे. असेही न झाल्यास त्याला आपल्या पत्नीला रिंगणात उतरावे लागणार किंवा बाजूच्या प्रभागात त्या शोधावा लागणार आहे. त्यामुळे किमान आपल्या प्रभागात एका महिलेचे आरक्षण पडो, अशी इच्छा अनेकांनी बोलावून दाखविली आहे. अनेकांनी तर त्यासाठी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com