Amruta Fadnavis : मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम; अमृता फडणवीसांची काय म्हणाल्या?

राज्यपालांचं मराठी भाषेवर प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत, जे मराठी शिकत आहेत. असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.
Amrita Fadnavis,  Bhagat Singh Koshyari
Amrita Fadnavis, Bhagat Singh KoshyariSaam TV

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले. अनेकांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर टीका देखील केली. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

Amrita Fadnavis,  Bhagat Singh Koshyari
Maharashtra Politics : भगतसिंह कोश्यारी यांचे राज्यपालपद जाणार? फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, चर्चांना उधाण

राज्यपालांचं मराठी भाषेवर प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत, जे मराठी शिकत आहेत. असं अमृता फडणवीसांनी (Amrita Fadnavis) म्हटलं आहे. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो, ते मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस आज मुंबईत आल्या होत्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat-Singh-Koshyari) यांनी केलेल्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. याशिवाय त्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरही स्पष्टपणे बोलल्या.

Amrita Fadnavis,  Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?; ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

मी राज्यपालांना जवळून ओळखते. त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. ते मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

'श्रद्धाला न्याय मिळायलाच पाहिजे'

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, अमृता फडणवीसांनी संताप व्यक्त केला. श्रद्धाबाबत झाले त्याबाबत दुःख होतंय. खोलात जावून तिला न्याय मिळाला पाहिजे. असा न्याय मिळाला पाहिजे की सगळे हादरले पाहिजेत. स्त्रीयांवर हात उचलायची, कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे गरजेचे आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com