Ambernath Crime News: ज्याच्यावर गोळीबार झाला, तोच निघाला आरोपी; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या...

ज्याच्यावर गोळीबार झाला, तोच निघाला आरोपी; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या...
Ambernath Crime News
Ambernath Crime NewsSaam TV

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. कारण ज्याच्यावर गोळीबार झाला, त्याच्याच गावठी कट्ट्यातून त्याला गोळी लागली. तोच निघाला आरोपी, त्यामुळं पोलिसांनी त्याच्या विरोधात कट रचण्यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेतल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत ढाबा परिसरात १५ जुलैच्या दुपारी १.३० वाजता अलोक आणि त्याचे काही मित्र या ठिकाणी एकत्र आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विवेक नायडू यांचा बदला घेण्यासाठी आलोक यादव, चंदन भदोरिया, आणि रोहित सिंह पुना हे मित्र याठिकाणी येऊन विवेक याच्या हत्येचा कट रचण्यासाठी हे कल्याणहून बदलापूर याठिकाणी आले होते.

Ambernath Crime News
Shinde-Fadnavis-Pawar Govt PC : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पावसाची चिंता आम्हालाही आहे; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही

कारण विवेक नायडू याने काही दिवसांपूर्वी चंदन यांच्या भावावर कल्याणच्या काळा तलाव या ठिकाणी गोळीबार केला होता. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक हा फरार झाला होता. भावावर गोळीबार झाल्याचा बदला घेण्यासाठी या मित्रांनी अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत धाबा जवळ सगळे एकत्रित विवेक याला संपवण्याचा कट रचला.

हे सर्वजण बुलेट आणि पल्सर मोटरसायकल वरून कल्याणला जात होते. दरम्यान अंबरनाथच्या गणपत धाबा समोर आतिश पवार आणि त्याचा मित्र मिळाला या अतिश सोबत चंदन याची बाचाबाची झाली चंदन भदोरिया जवळ असलेल्या गावठी कट्टा त्याने काढून विवेक 'नायडू बद्दल माहिती दे, नाहीतर तुला जीवे ठार मारणार', अशी धमकी आतिश याला दिली. याच वेळी चंदन भटोरिया यांच्या हातातील गावठी कट्ट्यामधून एक गोळी फायर होऊन अलोक याच्या उजव्या मांडीत घुसली. यावेळी अतिश आणि त्याचा मित्र हे या भागातून पळून गेले.

Ambernath Crime News
Hyundai Grand I10: जबरदस्त आहे 'ही' फॅमिली कार, मिळत आहे मोठी सवलत; जाणून घ्या काय आहे ऑफर...

चंदन भटोरिया आणि रोहित सिंह पूना यांनी जखमी अलोकला त्यानंतर उल्हासनगरच्या मॅक्स लाइफ हॉस्पिटलमध्ये अलोक याला आणण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच, अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण प्रकार लक्षात घेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये आलोक आणि त्याच्या साथीदाराने खोटा बनाव करत, अलोकवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. (Latest Marathi News)

पोलिसांना हे प्रकरण खोटं असल्याचं समजलं, एका एका आरोपीची चौकशी केल्या असता खरं प्रकरण समोर आलं. यामध्ये जखमी आरोपी आलोक यादव, रोहित सिंह पुना आणि मुख्य आरोपी चंदन भदोरिया या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस आणि गुन्हात वापरलेले मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. या सर्व आरोपींवर याआधी देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर यामध्ये एक आरोपी फरार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com