मुंबई महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप; भाजपचे थेट आयुक्तांना पत्र

टनेल लाँड्री बनवण्याचा कंत्राट रद्द करण्याची मागणी
BMC
BMCSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महापालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. महापालिका (Municipal Corporation) आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्नारे केली आहे. ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी असा प्रश्न अमित साटम यांनी उपस्थित केला आहे.

भाजप (BJP) आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त (Commissioner)- प्रशासक इक्बाल चहल यांना लिहीलेल्या पत्रात खळबळजनक आरोप (Allegations) करण्यात आले आहेत. टनेल लाँड्रीचे कंत्राट काढण्यासाठी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली आहे. त्याचे सविस्तर पुरावे मी वेळ आल्यावर तपास यंत्रणेला सादर करणार असल्याचे साटम यांनी यावेळी म्हटले आहे. कुठलेही तंत्रज्ञान, टेकनिकल स्पेसीफिकेशन किंवा अनुभव याविषयी यामध्ये कुठलीही एकसुत्रता नाहीये आणि सगळ्या गोष्टी विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होणार याकडे लक्ष दिले, असल्याचा आरोप देखील साटम यांनी केला आहे.

हे देखील पहा-

मुंबई महापालिकेकडून जेव्हा निविदा काढली जाते, तेव्हा मुंबई (Mumbai महापालिका आणि CVC च्या मार्गदर्शक तत्वानुसार संबंधित कंपनीच्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जात असतो. मात्र, या मार्गदर्शक तत्वांना धाब्यावर बसवून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विदेशातील कंपन्यांचा मार्ग सुकर करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या रुग्णालयाच्या आवारात ही टनेल लाँड्री उभारण्याचे प्रस्तावित आहे. ते क्षयरोगाचे रुग्णालय आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जर क्षयरोग रुग्णालयात टनेल लाँड्री बनवून तिथे धुवून आणि सुकवून पाठवले तरी त्याद्वारे जंतूसंसर्ग होणार नाही याची हमी आरोग्य विभाग देणार आहे का? असा प्रश्न अमित साटम यांनी केला उपस्थितीत केला आहे. जंतूसंसर्गाच्या

BMC
प्रशासनाला कोंडीत पकडण्यासाठी पुण्यात पीएमपी ठेकेदारांचा अचानक संप

भीतीने आरोग्य विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. आरोग्य विभागाला ही भीती वाटत असेल, तर भविष्यात रुग्णालयातील विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ही निविदा प्रक्रिया त्वरीत बंद करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. रुग्णालयांमध्ये वापरलेले कपडे धुण्यासाठी सध्या महापालिकेकडून परेल येथील विद्युत धुलाई केंद्राचा वापर केला जात आहे. हे केंद्र महापालिकेच्या मालकीचे आहे. मात्र, या केंद्राची कार्यक्षमता कमी झाल्याने याठिकाणी सध्या ५० टक्के कपडे धुतले जात आहेत. तर, उर्वरीत कपडे खासगी लाँड्रीतून धुतले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com