Dahi Handi News: महिला काँग्रेसने फोडली भ्रष्टाचार व महागाई विरोधात दहीहंडी

Varsha Gaikwad: महिला काँग्रेसने फोडली भ्रष्टाचार व महागाई विरोधात दहीहंडी
Dahi Handi News
Dahi Handi NewsSaam Tv

Dahi Handi News:

वाढती महागाई, जातीयवाद यांच्या विरोधात आम्ही प्रतिकात्मक हंडी फोडत आहोत. पण २०२४ मध्ये भाजपच्या पापांची हंडी, असं मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या भ्रष्टाचार व महागाईविरोधातील दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्यासह मुंबईतील काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती झालेल्या आमदार वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात विविध उपक्रम राबवून मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात काम सुरु केलं आहे.

Dahi Handi News
Realme Smartphone: 6.74 इंचाचा डिस्प्ले, 50 MP चा कॅमेरा; देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 'या' फोनची किंमत आहे फक्त 8999 रुपये...

आता महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई प्रदेश महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबई काँग्रेसच्या पटांगणात महिला दहीहंडीचे आयोजन केले होते. (Latest Marathi News)

या दहीहंडीच्या सोहळ्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमधून मोठ्या संख्येने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दहीहंडी फोडणाऱ्यांमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड अग्रस्थानी होत्या. त्यांनी महिला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत भ्रष्ट सरकारविरोधात घोषणा देत ही दहीहंडी फोडली. २०२४ मध्ये भाजप सरकारच्या पापाचा घडाही या हंडीसारखाच फुटेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Dahi Handi News
Bmc Property Tax: खरंच मुंबईत मालमत्ता कर वाढणार का? BMC ने दिलं स्पष्टीकरण...

भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळातच भ्रष्टाचार फोफावला आहे. त्याशिवाय महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. तसंच देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या सर्व कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही ही प्रतिकात्मक दहीहंडी फोडली, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com