Pune: शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा; कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास

कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास
Pune: शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा; कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास
Pune: शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा; कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपासरोहिदास घाडगे
Published On

रोहिदास घाडगे

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत भरदिवसा दरोडा robbery in Bank of Maharashtra टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावातील महाराष्ट्र बँकेवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना बँकेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. बँकेवर दरोडा टाकण्यात आल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्वाचा संदेश पाठवण्यात आला आहे.

हे देखील पहा-

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड या गावातील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोर २५-३० वयोगटामधील असल्याचे सांगितले जात आहे. ५-६ दरोडेखोरांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा आणि पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडीच्या पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. सदर गाडीमधून आरोपी नगर दिशेला पळून गेला आहे.

Pune: शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा; कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास
पोलीस पथकावर अतिक्रमण धारकांचा हल्ला; दोघांना घेतलं ताब्यात

शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावामधील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करण्यात आले आहे. तसेच या वर्णाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास अगर काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे. ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने सदरची गाडी आणि इसम पकडून ठेवावे असा संदेश पाठवण्यात आलेला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com