Maharashtra Politics : अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Ajit Pawar News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. त्यामुळे अजित पवार महायुती सोडण्याची चर्चा रंगलीय.. शिंदेंसोबत वाद झाल्यामुळे अजित पवारांनी कॅबिनेटमधून थेट काढता पाय घेतला. नेमकं काय घडलं आणि अजित पवारांबाबत व़डेट्टीवारांनी काय मोठा दावा केलाय ? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar Saam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीपुर्वीच महायुतीतील दरी वाढायला सुरुवात झालीय.. मंत्रिमंडळ बैठकीत दीड तासात तब्बल 80 निर्णय घेण्यात आले. मात्र या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या वादानंतर अजित पवारांनी थेट कॅबिनेटच्या बैठकीतून काढता पाय घेतला...नेमका काय वाद झाला ते पाहूयात....

शिंदे-अजितदादांमध्ये वाद?

अलिबाग-विरार कॉरिडोअर प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा अपेक्षित

प्रकल्पावर शिंदे-फडणवीसांच्या सह्या, दादांची मात्र सही नव्हती

अजित पवारांनी मंजुरी न दिल्यानं प्रकल्पाची घोषणा न झाल्याची माहिती

सही न केल्यास माझ्या अधिकारात ते करून घेईन, मुख्यमंत्र्यांचा टोला

चिडलेल्या अजित पवारांनी बैठक अर्धवट सोडल्याची माहिती

बारामतीचे प्रस्तावही मंजूर नाही, पवारांकडून प्रकल्प आलेत का? शिंदेंचा दादांना टोला

अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar News : बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' जरूर ठेवा, पण...'; अजित पवारांच्या भरत गोगावले यांना कानपिचक्या, VIDEO

महायुतीत वादात ठिणगी पडल्याचं समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. तर दादा आर्थिक शिस्तीचे असल्याने त्यांना महायुतीतून बाजुला सारण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर विरोधकांना नाक न खुपसण्याचा सल्ला भाजपनं दिलाय.

अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र त्याची कारणं काय आहेत पाहूयात...

अजितदादांच्या नाराजीची कारणं

महायुतीत कमी जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न

भाजप-शिंदे गटाकडून दादांवर करण्यात येणारी टीका

वाचाळवीर भाजप नेत्यांमुळे नाराज होणारा अल्पसंख्यांक मतदार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादांचा विरोध डावलून सीएम शिंदे रेटत असलेले प्रस्ताव

अजित पवार नाराजीच्या चर्चा रंगलेल्या असताना त्यात आता मंत्रिमंडळ बैठकीतील वादाची भर पडल्याचं म्हटलं जातंय. मात्र याबाबत अजित पवारांनी आपली भूमिका जाहीर केलीय.

अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकदा शिंदे आणि दादांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय. मात्र निवडणूक जवळ येत असताना महायुतीतले वाद अधिक तीव्र होताना दिसतायत. महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकजुटीनं लढण्याची घोषणा करतात तर कधी दादा स्वतंत्र लढण्याच्या चर्चा रंगतात. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की की महायुतीत सारं काही आलबेल नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com