Ajit Pawar : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरून अजितदादा संतापले; कार्यकर्त्यांना दिली तंबी

गौतमी पाटीलच्या अश्लिल डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजितदादांकडे केली.
Ajit Pawar On Gautami Patil
Ajit Pawar On Gautami PatilSaam TV
Published On

Ajit Pawar On Gautami Patil : लावणी डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलने तरुणांना चांगलीच भुरळ घातली आहे. वाढदिवस असो, वा पार्टी राज्यात अनेक ठिकाणी गौतमी पाटीलला निमंत्रण असतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे व्हिडीओ समोर आले. यावरून अजितदादांनी संताप व्यक्त केला असून कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी सुद्धा दिली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar On Gautami Patil
Pune News : कुत्र्यांनी पाठलाग करत चिमुकल्याला घेरलं अन्.., थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लिल डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी अजितदादांकडे केली.

दरम्यान, मेघा घाडगे यांच्या या तक्रारीनंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.

Ajit Pawar On Gautami Patil
Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून तरुणांनी सुरू केला चहाचा व्यवसाय; कमाई ऐकून थक्क व्हाल!

काय म्हणाले अजित पवार?

राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये, असं अजितदादांनी म्हटलं आहे.

काही जिल्ह्यात अशा कार्यक्रमांना बंदी आहे. मात्र, परंपरा सुद्धा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं देखील अजितदादांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आता असे कार्यक्रम ठेवण्याची स्पर्धाच लागली आहे. अशा कार्यक्रमांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच बोर्ड असतो. हे योग्य नाही. आम्ही जिल्हाप्रमुख पदाधिकारयांना तशा सूचना देण्यात येतील, अशी तंबीही अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com