अश्विनी जाधव केदारी
पुणे: आज पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या (AJit Pawar) उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोविड सेंटर मध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपांचे खंडन करत जम्बो हॉस्पिटलच्या व्यवहारात चुकीचे काहीही होऊ दिलेले नाही असे स्पष्टपणे सांगितले.
किरीट सोमय्या यांनी पुण्यातील (Pune) जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितलं कोविड सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता. (Ajit Pawar News)
पुण्यातील कोरोना परिस्थिती बऱ्याच अंशी आटोक्यात;
कोरोना परिस्थितीचा आढावा बैठकीत अजित पवारांनी माहिती दिली की, "जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये सूट मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. पुण्यातील परिस्थिती बऱ्याच अंशी आटोक्यात यायला लागलीय रुग्णसंख्येत घट होत आहे, राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 9 टक्के आहे. कोव्हक्सींन हव्या त्या प्रमाणात जिल्हयाला आणि राज्याला मिळावा यासाठी पाठपुरावा करु. तसेच थिएटर मध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवून परवानगी आहे, त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांशी बोलून करता येईल", अशी माहिती त्यांनी दिली आहे.
जम्बो हॉस्पिटलच्या व्यवहारात काहीही चूक नाही;
अजित पवार म्हणाले, 'मागील काही दिवसांपासून पुण्यात आणि मीडियात जम्बो हॉस्पिटलबाबत चर्चा सुरु आहे. कोरोनाचे सावट आले तेव्हापासून पारदर्शक काम व्हावे याचा आम्ही कटाक्षाने काळजी घेतली आहे. जम्बो हॉस्पिटलमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांना मध्ये न करता सर्व शासकीय अधिकारी काम करत होते. अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या सर्व पारदर्शक कारभार व्हावा आज बैठकीत हा विषय घेतला, त्या संदर्भात नोट केलीय. जम्बो हॉस्पिटलच्या व्यवहारात चुकीचे काहीही होऊ दिलेले नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.
पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या, पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी आले होते. मात्र त्यावेळेस पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने केली आणि त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पायऱ्यांवर झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली होती. त्यामुळे ते पायऱ्यांवरून खाली देखील पडले होते. तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले. या सर्व प्रकारामुळे सोमय्या यांना परतावे लागले होते. गोंधळात खाली पडल्यामुळे त्यावेळी सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर बरे झाल्याबर आक्रमकपणे सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केलेली आहे, त्यावर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.