Pune : "प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले

Pune News : येरवड्यात एड्स आणि हृदयविकार प्रार्थनेने बरे होतात. असा अंधश्रद्धेचा प्रचार करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा मुक्ती मिशनच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली.
"प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • प्रार्थनेने गंभीर आजार बरे होतात असा खोटा प्रचार करणाऱ्यांवर FIR दाखल

  • अंधश्रद्धा मुक्ती मिशनच्या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी कारवाई केली

  • जाहिरात पत्रके आणि कार्यक्रमाद्वारे अघोरी प्रथा व भोंदूगिरीचा प्रसार

  • जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार पुढील तपास पोलिसांकडून सुरू

सागर आव्हाड, पुणे

हृदयविकार आणि एड्स सारखा गंभीर आजार बरा होत असल्याचे जाहिरात पत्रके वितरण करून, अनिष्ट अघोरी प्रथाचा प्रचार करून सभागृहात मोठा कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात कार्यक्रम आयोजक करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट,अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. जगतारसिंग धर्मसिंग चव्हाण आणि रमेश संपत वावरे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे.

याप्रकरणी सिद्धार्थ शाहूराज चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे की, फिर्यादी चव्हाण हे अंधश्रद्धा मुक्ती मिशनचे अध्यक्ष आहेत. चव्हाण हे घरी जात असताना दापोडी सिग्नलला थांबले असताना एक व्यक्ती जाहिरात पत्रके वाटप करत होता. त्यावेळी चव्हाण यांना पत्रक मिळाले.त्यात एड्स आणि ह्रदय रोग सारखा गंभीर आजारावर कोणतेही उपचार न करता, फक्त देवाची प्रार्थना केल्यावर बरा होतो.लोकांना आम्ही बरे करून दाखवले आहे. यावर विश्वास ठेवण्यासाठी एका महिलेचा अनुभव पत्रकावर छापण्यात आला होता.

"प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले
Mumbai : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, लहान मुलांसह १० जणांवर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

आजारी लोकांना बरे करण्यासाठी येरवड्यातील अण्णा भाऊ साठे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एका दांपत्याला मंचावर बोलावून अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत असताना 'पास्टर 'शी मुलाची ओळख झाली.

"प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले
Today Weather : महाराष्ट्र गारठला! परभणीत पारा ५.५ अंशावर, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, आज कसं राहिलं हवामान?

वडिलांना भेटायला जाताना व्हिडिओ कॉल करून दाखवल्यावर वडील अतिदक्षता मधून जनरल विभागात शिफ्ट झाले,असा प्रचार करण्यात आला. असे फिर्यादी यांनी जबाब दिला आहे. त्यामुळे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर कार्यक्रम आयोजित करून अंधश्रध्दा पसरविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com