Abdul Sattar News: मी कृषीमंत्री झालो तेव्हापासून हे ११ वे संकट आहे; अब्दुल सत्तार काय म्हणाले, पाहा VIDEO

Abdul Sattar Latest News: मी राज्याचा कृषिमंत्री झालो तेव्हापासून आलेलं हे ११ वे संकट आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain
Abdul Sattar On Maharashtra Unseasonal RainSaam TV
Published On

Abdul Sattar Latest News: गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गाटपीट झाल्याने शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेल्या घास अवकाळीने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी, शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक विधान केलं आहे. (Latest Marathi News)

Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अलिशान कारचा भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चिमुकली थोडक्यात बचावली

मी राज्याचा कृषिमंत्री झालो तेव्हापासून आलेलं हे ११ वे संकट आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्तार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. (Breaking Marathi News)

राज्यातील ज्या भागात १० मिलिमीटर किंवा सलग ४ ते ५ दिवस पाऊस झाला तोच शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र असेल, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी उभं राहिलं आहे. मी राज्याचा कृषिमंत्री झालो तेव्हापासून आलेलं हे ११ वे संकट आहे, असंही सत्तार यांनी यावेळी म्हटलं.

Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain
Buldhana Flood Video: बुलडाण्यात भर उन्हाळ्यात बाणगंगा नदीला पूर, बघता बघता ५ गायी ओढ्यात गेल्या वाहून

दरम्यान, राज्यात लवकर आम्ही नॅनो युरिया हा नवीन प्रयोग सुरू करणार असून ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता येईल, या प्रयोगाची जबाबदारी राहुरी आणि परभणी येथील कृषि विद्यापीठाला ती जबाबदारी देण्यात आली आहे, असंही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितलं आहे.

मराठवाड्यात गाटपीटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा १५३ गावांना फटका बसला असून १० जण वीज पडून ठार झाले आहेत. या सोबतच १ हजार १७९ कोंबड्या तर १४९ जनावरे दगवली आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्थांनी केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com