Petrol Price : पेट्रोलचे दर गगनाला; पुण्यात आता डिझेलचीही शंभरी पार!

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या किंमती भडकत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. पेट्रोल डिझेल दर वाढ झाल्याने महागाई देखील शिखरावर पोहचली आहे.
Petrol
PetrolSaamTvNews

पुणे : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. या वाढत्या पेट्रोल दराला कुठे थांबा मिळणार याबद्दल सध्या कोणीच काही सांगू शकत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या किंमती भडकत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. पेट्रोल डिझेल दर वाढ झाल्याने महागाई देखील शिखरावर पोहचली आहे. याचाच परिणाम म्हणून दोन दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईतील रिक्षा संघटनानी देखील आपले प्रवासी भाडे वाढवले आहे.

हे देखील पहा :

पुण्यातील पेट्रोल डिझेलचे ताजे दर :

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असताना आज डिझेलनेही शतकाचा टप्पा गाठला आहे. डिझेल 100.08 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

  • पेट्रोल - 110.92 प्रतिलिटर

  • पॉवर पेट्रोल -114.60

  • डिझेल - 100.08 प्रतिलिटर

  • सीएनजी - 62.10 प्रतिकिलो

१०० रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल देखील मिळत नसल्याची महागडी वेळ सर्वसामान्यांच्या जीवनात आली आहे. याला महागाईचा परमोच्च बिंदूच मानावे लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर कमी झाले आणि जास्त झाले तरीही सामान्यांना त्याबद्दल कोणतेही सोईरसुतक असल्याचे दिसत नाही.

Petrol
Crime : विहिरीत मृतावस्थेत आढळला युवक-युवतीचा मृतदेह! घातपात की आत्‍महत्‍या?

वाढती महागाई आणि त्याच तुलनेत घटलेले उत्पन्न यांचा सामना करताना सामान्य नागरिकांची मात्र, निश्चित दमछाक होत आहे. इंधनाचे दर वाढले कि महागाई वाढणार हे साधे गणित आहे. सद्यस्थितीत पेट्रोलचे दर काही कमी होण्याचे चिन्ह नाही. परकीय चलन दरासह आंतरराष्टीय बाजारात कच्या तेलाच्या किमती काय आहे यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो. रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे मात्र सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

पेट्रोल डिझेलचे दर वाढताना रुपयांमध्ये वाढतात आणि कमी होताना मात्र एक दोन पैशांनी कमी होतात. त्यामुळे जोपर्यंत विधानसभा लोकसभा निवडणूक येत नाहीत तोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार इंधन Fuel दरवाढ या प्रश्नाला गांभीर्याने घेणार आहे कि नाही? असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.
Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com