मुंबई : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत बीकेसी मैदानातील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक भाजप नेत्यांवर निशाणा साधला. ठाकरेंनी यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहित अनेक भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही खोचक टीका केली होती. 'आरएसएस'वर केलेल्या टीकेवरून भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ( Acharya Tushar Bhosale criticized CM Uddhav Thackeray )
हे देखील पाहा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या बीकेसी मैदानातील सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. ठाकरे यांनी अयोध्या, बाबरी मशिदीवरून देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली होती. तसेच देवेंद्र फडणवीसांचा मुंबई स्वतंत्र्य करायचा डाव आहे, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. 'राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान नाही', असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी संघावर केला होता. राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केलेल्या आरोपावर भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. 'सर्वस्वाचा त्याग’हे ज्या पवित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मूळ आहे. त्याबद्दल बोलण्याची ‘चंगळवादाचे भोगी’ असलेल्या उद्धव ठाकरेंची तिळमात्रही पात्रता नाही', अशा शब्दात आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भोसले यांच्या प्रतिक्रियेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काय म्हणाले होते ?
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर खोचक टीका केली होती. ठाकरे म्हणाले होते,'व्यक्ती हा भगवी टोपी घातल्यानंतर हिंदू बनतो, तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची टोपी काळी का ?, असा सवाल त्यांनी केला होता. पुढे ठाकरे म्हणाले की,'राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत काहीच योगदान नाही. संघ कधीही या लढाईत सहभागी झाला नव्हता, असा घणाघात ठाकरेंनी संघावर केला होता.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.